IPL 2025 क्वॉलिफायर 2 फेरीत युजवेंद्र चहल सर्वस्वी पणाला लावण्यास तयार, मुंबई इंडियन्स विरुद्ध घेणार मोठा निर्णय

आयपीएल 2025 स्पर्धेतील क्वॉलिफायर 2 फेरीचा सामना पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. या सामन्यात पंजाब किंग्सची बाजू मुंबईच्या तुलनेनं कमकुवत आहे. असं असताना या सामन्यापूर्वी युजवेंद्र चहल एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारी आहेत. काय ते जाणून घ्या.

IPL 2025 क्वॉलिफायर 2 फेरीत युजवेंद्र चहल सर्वस्वी पणाला लावण्यास तयार, मुंबई इंडियन्स विरुद्ध घेणार मोठा निर्णय
युजवेंद्र चहल
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 01, 2025 | 4:34 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. क्वॉलिफायर 2 फेरीतून अंतिम फेरीचा दुसरा संघ ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे. असं असताना या सामन्यात फिरकीपटू युजवेंद्र चहल खेळणार की नाही याबाबत शंका आहे. कारण दुखापतीमुळे मागच्या तीन सामन्यात खेळला नव्हता. मनगटाच्या दुखापतीमुळे चहलला या सामन्यात खेळला नव्हता. पण अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममद्ये कमबॅकसाठी सज्ज असल्याचं बोललं जात आहे. याबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका रिपोर्टनुसार, चहल मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरण्यासाठी तयार आहे. यासाठी त्याने इंजेक्शन घेण्याची तयारीही दर्शवली आहे. क्वॉलिफायर 2 सामन्यासाठी युझवेंद्र चहल खूपच उत्साहित असल्याचं बोललं जात आहे.

युझवेंद्र चहलच्या फिटनेसमध्ये गेल्या काही दिवसात सुधारणा झाली आहे. तसेच सराव शिबिरातही भाग घेतल आहे. इतकंच काय तर नेट्समध्ये काही षटकंही टाकली. त्यामुळे युझवेंद्र चहलकडे पंजाब किंग्सच्या चाहत्यांचं लक्ष लागून आहे. पंजाब किंग्सवर प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आली तर युजवेंद्र चहल इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरू शकतो. युजवेंद्रने या स्पर्धेत 9.56 च्या इकोनॉमी रेटने धावा देत 14 विकेट घेतल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध चार विकेट घेतल्या होत्या. इतकंच काय तर या स्पर्धेत हॅटट्रीक घेणारा एकमेव खेळाडू आहे. यामुळे त्याचा फॉर्म जबरदस्त असल्याचं दिसून आलं आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सविरुद्धही चहलने चांगली कामगिरी केली आहे.

युझवेंद्र चहलने मुंबई इंडियन्सविरुद्ध वेगवेगळ्या फ्रेंचायझींकडून 20 सामने खेळले आहे. यात त्याने 21.24 च्या सरासरीने आणि 8 च्या इकोनॉमीने 29 विकेट घेतल्या आहे. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांना देखील चहलच्या गोलंदाजीचा सामना करताना अडचणींचा सामना करावा लागल्याचं दिसून आलं आहे. आशा स्थितीत युजवेंद्र चहल जर मुंबई इंडियन्सविरुद्ध उतरला तर पंजाब किंग्सची ताकद वाढणार आहे.