
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने झिंबाब्वे विरूद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यात झंझावाती बॅटिंग केली आहे. संजूने मैदानात येताच विस्फोटक बॅटिंगला सुरुवात केली. संजूने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे बॅटिंग दरम्यान खणखणीत सिक्स ठोकला, जो सर्वच पाहत राहिले. टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची काही खास सुरुवात राहिली नाही. यशस्वी जयस्वाल, कॅप्टन शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा हे तिघे अनुक्रमे 12,13 आणि 14 अशा धावा करुन आऊट झाले. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 3 बाद 40 अशी झाली.
त्यानंतर संजू सॅमसन मैदानात आला. संजूचा हा या मालिकेतील तिसरा सामना ठरला. संजूला चौथ्या सामन्यात 1 विकेट्सने विजय झाल्याने बॅटिंगची संधी मिळाली नाही. तर संजू तिसऱ्या सामन्यात 12 धावांवर नाबाद राहिला. मात्र संजूने पाचव्या सामन्यात सर्व हिशोब बरोबर केला. संजूने 110 मीटर लांब गगनचुंबी सिक्स मारला. संजूने मारलेला फटका पाहून सारेच थक्क झाले.
संजूने टीम इंडियाच्या डावातील 12 व्या ओव्हरमध्ये हा सिक्स ठोकला. ब्रँडन मावुता 12 वी ओव्हर टाकायला आला. संजूने या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर कडक फटका मारला. संजूने मारलेला फटका थेट छतावर जाऊन पडला. संजूने मारलेल्या फटक्यामुळे बॉल मिळाला नाही. त्यामुळे अंपायरला दुसरा बॉल मागवावा लागला. संजूने या सिक्ससह टी20 क्रिकेटमध्ये कारनामा केला. संजूने टी 20 क्रिकेटमध्ये 300 सिक्स पूर्ण केले.
संजू इथेच थांबला नाही. त्याने पुढच्याच बॉलवर लाँग ऑफच्या दिशेने आणखी एक सिक्स खेचला. सॅमसनने अवघ्या 39 बॉलमध्ये 4 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. संजूने 45 बॉलमध्ये 58 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 167 धावापर्यंत पोहचण्यात मदत झाली.
संजू सॅमसनचा कडक सिक्स
.@IamSanjuSamson launches one into the orbit 💥🥵
A 1️⃣1️⃣0️⃣M hit by the wicketkeeper 🔥#SonySportsNetwork #ZIMvIND #TeamIndia | @BCCI pic.twitter.com/hjXmgOnnSS
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 14, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रियान पराग, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे आणि मुकेश कुमार.
झिम्बाब्वे प्लेइंग ईलेव्हन : सिकंदर रझा (कर्णधार), वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), ब्रँडन मावुता, रिचर्ड नगारावा आणि ब्लेसिंग मुझाराबानी.