
बीसीसीआय निवड समितीने अवघ्या काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने यासह रोहित शर्मा याच्या जागी शुबमन गिल याची एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्ती केली. शुबमन गिल ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून एकदिवसीय कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. रोहितला एकाएकी कर्णधारपदावरुन हटवल्याने चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणार्या कर्णधाराला अशाप्रकारे हटावल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
रोहितला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर अवघ्या काही दिवसात एका संघाचं कर्णधार करण्यात आलं आहे. झिंबाब्वेचा स्टार ऑलराउंडर सिंकदर रझा याने रोहितला आपल्या टीमचा कॅप्टन म्हणून निवडलं आहे. एका कार्यक्रमात सिकंदर रझा याला त्याच्या सर्वकालिन टी 20i संघाबाबत विचारण्यात आलं. तेव्हा सिंकदरने रोहितला आपल्या बेस्ट 11 टीमचा कॅप्टन केला. मात्र रजाने आपल्या टीममध्ये विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांना स्थान दिलं नाही.
सिकंदर रजा याने त्याच्या बेस्ट प्लेइंग ईलेव्हनमध्ये ओपनर म्हणून विंडीजचा माजी फलंदाज ख्रिस गेल याला ओपनर म्हणून पसंती दिली आहे. तर विकेटकीपर म्हणून निकोलस पूरन याला संधी दिली आहे. मिस्टर 360 एबी डीव्हीलियर्स, हेनरिक क्लासेन आणि कायरन पोलार्ड या त्रिकुटावर मिडल ऑर्डरची धुरा सोपवली आहे.
तसेच रझाने ऑलराउंडर म्हणून रवींद्र जडेजा आणि शाहिद अफ्रिदी या दोघांची निवड केली आहे. फिरकीपटू म्हणून अफगाणिस्तानच्या राशिद खान याचा समावेश करण्यात आला आहे. तर रझाने मिचेल स्टार्क, शाहिन अफ्रिदी आणि जसप्रीत बुमराह या तिघांवर वेगवान गोलंदाजीची धुरा सोपवली आहे.
सिकंदर रजा याची ऑलटाईम बेस्ट टी 20i प्लेइंग इलेव्हन : ख्रिस गेल, रोहित शर्मा (कर्णधार), निकोलस पूरन (विकेटकीपर), एबी डिविलियर्स, हेनरिक क्लासेन, कायरन पोलार्ड, रवींद्र जडेजा, राशिद खान, जसप्रीत बुमराह, शाहीन अफरीदी आणि मिचेल स्टार्क.
दरम्यान आता रोहितला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदातून मुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.