IND vs ZIM 3rd T20 : झिम्बाब्वेविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 आधी शुबमन गिलची ‘अग्निपरीक्षा’, स्टार खेळाडूला डच्चू?

ind vs zim 3rd t-20 : टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यामधील तिसऱ्या टी-20 सामन्यात टीममध्ये बदल झालेला पाहायला मिळू शकतो. टीम इंडियाने दुसरा सामना जिंकत किलर कमबॅक केलं असलं तरीसु्द्धा दोन खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

IND vs ZIM 3rd T20 : झिम्बाब्वेविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 आधी शुबमन गिलची अग्निपरीक्षा, स्टार खेळाडूला डच्चू?
| Updated on: Jul 10, 2024 | 3:10 PM

टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमधील पाच सामन्यांची मालिका सुरू आहे. यामधील पहिला सामना झिम्बाब्वेने जिंकत दमदार सुरूवात केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या वाघांनी जोरदार कमबॅक केलं. झिम्बाब्वेचा 100 धावांनी पराभव केला. 20 ओव्हरमध्ये 234 धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेच्या फलंदाजांना टीम इंडियाच्या  वेगवान गोलंदाजांनी 134 धावांवर ऑल आऊट केलं होतं. टीम इंडियाने दमदार विजय मिळवूनही तिसऱ्या टी-20 सामन्यात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेचा पराभव केला असला तरी एका खेळाडूला डच्चू मिळण्यासाठी शक्यता आहे.

टीम इंडियामध्ये फार मोठा बदल होण्याची शक्यता म्हणजे संजू सॅमसन हा तिसऱ्या सामन्यामध्ये खेळण्याची शक्यता आहे. मात्र याचा फटका थेट ध्रुव जुरेल याला बसू शकतो. कारण संजूला संघात स्थान दिल्यावर टीम इंडियाच्या प्लेइंग11 मधून जुरेलला बाहेर बसावं लागणार आहे. दुसरा बदल म्हणजे शिवम दुबे याला जर संधी मिळाली रियान पराग प्लेइंग 11 मधून बाहेर असेल. मागील सामन्यात गिलने एक बदल केला होता तो म्हणजे खलील अहमद याला बाहेर केलं होतं. त्याच्या जागी संघात साई सुदर्शन याला घेतलं होतं.

साई सुदर्शन याला संघात घेतलं खरं पण त्याला बॅटींग करण्याची संधी मिळाली नाही. रुतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांनी झिम्बाब्वेला फोडून काढलं. त्यानंतर रिंकू सिंहने राहिलेली कसर भरून काढली. त्यामुळे येत्या सामन्यांमध्ये हे तीन खेळाडू बदलले जाणार नाहीत. बदल केलाच तर संजू आणि शिवम यांना संघात घेतलं जावू शकतं.

तिसऱ्या टी- 20 साठी संभाव्य टीम इंडिया

शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, संजू सस्सामन, रिंकू सिंग, शिवम दुबे, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार आणि रवी बिश्नोई.