रवींद्र जाडेजासह 19 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

| Updated on: Aug 17, 2019 | 9:39 PM

भारतीय क्रिकेट टीममधील ऑल राऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजाला यावर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासोबतच महिला क्रिकेटर पूनम यादवचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

रवींद्र जाडेजासह 19 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट टीममधील ऑल राऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजाला यावर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासोबतच महिला क्रिकेटर पूनम यादवचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयकडून यंदा अर्जुन पुरस्कारासाठी चार क्रिकेटरांची नावं पाठवण्यात आली होती. ज्यामध्ये रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि पूनम यादवच्या नावाचा समावेश होता.

यावर्षी अर्जुन पुरस्कारासाठी एकूण 19 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये क्रिकेटर रवींद्र जाडेजा आणि पूनम यादव, गोळाफेकपटू तेजिंदर पाल सिंह तूर, भालाफेकपटू मोहम्मद अनस आणि स्वप्ना बर्मन, फुटबॉलरपटू गुरप्रीत सिंह संधू, हॉकी खेळाडू चिंगलेनसना सिंह कांगुजाम आणि निशाणेबाज अंजुम मुंदगील यांच्या नावाचा समावेश आहे.

राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार विजेता

दरम्यान, राष्ट्रीय आणि आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई करणारा कुस्तीपटू बजरंग पूनिया आणि पॅरालिम्पिकपटू दीपा मलिक यांना देशातील सर्वोच्च राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

नुकतेच रवींद्र जाडेजाने क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली. त्याने स्वत:ला तीन फॉरमॅटमध्ये सिद्ध करुन दाखवले. जडेजाने 41 कसोटी, 156 एक दिवसीय सामने आणि 42 टी 20 सामने खेळले आहेत. जडेजाने विश्वकप 2019 मध्ये सेमीफायनलमध्ये 59 चेंडूत 77 धावांची शानदार खेळी केली होती. पण भारता हा सामना 18 धावांनी पराभूत झाला होता.

2019 च्या खेळ पुरस्कारासाठी विजेत्यांची यादी

राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार : बजरंग पूनिया (कुस्ती) आणि दीपा मलिक (पॅरालिम्पिकपूट)
अर्जुन पुरस्कार : तेजिंदर पाल सिंह तूर, मोहम्मद अनस, स्वप्ना बर्मन (तिन्ही अॅथेलेटिक्स खेळाडू), एस. भास्करन (शरीर सौष्ठव), सोनिया लाठेर (फायटिंग), रवींद्र जडेजा, पूनम यादव (क्रिकेटर)
द्रोणाचार्य पुरस्कार : विमल कुमार (बॅटमिंटन), संदीप गुप्ता (टेबल टेनिस), मोहिंदर सिंह ढिल्लन (अॅथेलेटिक्स)