
क्रिकेटच्या मैदानावर दमदार फलंदाजीने चाहत्यांचे हृदय जिंकणार रोहित शर्मा याने आता नवीन आलिशान Tesla Model Y कार घेतली आहे. भारतात इलेक्ट्रीक कारची लोकप्रियता वाढत आहे. आता टीम इंडियाचे हिटमॅन रोहितने देखील या दिशेने पाऊल उचलले आहे.त्याने अलिकडेच Tesla Model Y RWD Standard Range व्हेरिएंट खरेदी केली आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 67.89 लाख रुपये आहे.
रोहित शर्मा याच्या नवीन इलेक्ट्रिक SUV मध्ये 75 kWh बॅटरीचा पॅक दिलेला आहे. ही कार एकदा चार्ज केली की सुमारे 622 किलोमीटर पर्यंत धावू शकते. ही मॉडेल रिअर – व्हील ड्राईव्ह (RWD) सिस्टमवर आधारित आहे. याची मोटर 220 kW पॉवर मिळते. जी 295 बीएचपीची ताकद देते. आणि 420 Nm टॉर्क निर्मिती करते.
Tesla Model Y ची डिझाईन एकदम मॉर्डन आहे. तंत्रज्ञानाच्या बाबती ही कार कोणत्याही लक्झरी ब्रँडहून कमी नाही. यात 15.4 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे. प्रीमियम इंटीरियर, ऑल-एलईडी लाईट्स, हीटेड आणि वेंटिलेटेड सिट्स, एंबिएंट लायटिंग, आणि 9-स्पीकरचा प्रीमियम साऊंड सिस्टम भेटतो.या शिवाय ऑटोमॅटीक इमर्जन्सी ब्रेकींग, ब्लाईंड कोलिजन वॉर्निंग, आणि ग्लास रुफ सारख्या सुविधा हिला खास बनवतात.
रोहित शर्माची या टेस्लाची नंबर प्लेट 3015 अशा आहे आणि या नंबर प्लेटचा त्यांच्याशी अनोखा संबंध आहे. 30 डिसेंबर रोहित शर्मा याच्या मुलीचा जन्मदिन आहे आणि 15 नोव्हेंबर मुलाचा..त्यामुळे रोहित शर्मा याने या स्पेशल नंबर प्लेटची निवड केली आहे.
रोहित शर्माकडे अनेक लक्झरी कार आहेत. त्याचे गॅरेज या कारने भरलेले आहे. रोहितजवळ लेम्बोर्गिनी उरुस एसई,रेंज रोव्हर एचएसई लॉन्ग व्हीलबेस, मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, जीएलएस 400डी, बीएमडब्ल्यू एम 5, स्कोडा ऑक्टेविया आणि टोयोटा फॉर्च्यूनर सारख्या शानदार कार आहेत.