CSK vs DC, IPL 2021 | आधी शून्यावर बाद, त्यानंतर दिल्लीकडून मोठा पराभव, ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीला ‘जोर का झटका’

| Updated on: Apr 11, 2021 | 4:03 PM

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या (delhi capitals) सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने आवश्यक तो (slow over rate) ओव्हर रेट राखला नाही. त्यामुळे कर्णधार या नात्याने महेंद्रसिंह धोनीला (mahendra singh dhoni) 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

CSK vs DC, IPL 2021 | आधी शून्यावर बाद, त्यानंतर दिल्लीकडून मोठा पराभव, कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीला जोर का झटका
दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या (delhi capitals) सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने आवश्यक तो (slow over rate) ओव्हर रेट राखला नाही. त्यामुळे कर्णधार या नात्याने महेंद्रसिंह धोनीला (mahendra singh dhoni) 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Ddelhi Capitals) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने या हंगामाची विजयी सुरुवात केली. तर अनुभवी चेन्नईला पराभवाला सामोरे जावे लागले. कर्णधार धोनीला या पराभवासह दुहेरी झटका बसला आहे. धोनीने सामन्यातील दुसऱ्या डावात योग्य षटतगती (Slow Over Rate) राखली नाही. त्यामुळे धोनीला कर्णधार म्हणून लाखोंचा दंड ठोठावण्यात आला आहे. (csk vs dc 2021 chennai super kings captain mahendra singh dhoni fined for slow over rate against delhi capitals)

नक्की प्रकरण काय ?

आयपीएलच्या नव्या नियमांनुसार 20 ओव्हरचा खेळ हा निर्धारित 90 मिनिटांमध्ये पूर्ण करायचा आहे. मात्र धोनीच्या चेन्नईने या ठराविक वेळेपेक्षा अधिक वेळ घेतला. चेन्नईला आवश्यक तो ओव्हर रेट राखता आला नाही. यामुळे धोनीला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या मोसमातील धोनीकडून ही चूक होण्याची पहिलीच वेळ ठरली. त्यामुळेच धोनीला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

धोनी चौथ्यांदा शू्न्यावर बाद

दिल्ली विरुद्धच्या या सामन्यात धोनी शून्यावर बाद झाला. आवेश खानने धोनीचा त्रिफळा उडवला. धोनी भोपळा फोडण्यातही अपयशी ठरला. धोनी शून्यावर बाद झाला. धोनी आयपीएलमध्ये शून्यावर आऊट होण्याची ही चौथी वेळ ठरली. धोनीकडून त्याच्या चाहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र धोनी शून्यावर बाद झाल्याने त्यांची निराशा झाली.

7 विकेट्सने पराभव

युवा दिल्लीकडून अनुभवी चेन्नईला 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. चेन्नईने विजयासाठी दिलले 189 धावांचे आव्हान दिल्लीने 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या जोडीने 138 धावांची सलामी भागीदारी केली. तसेच या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. शिखरने 85 तर पृथ्वीने 72 धावांची खेळी केली. गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. मात्र या दोघांनी या सामन्यात चमकदार कामगिरी केली. या जोडीने केलेल्या शानदार शतकी भागीदारीच्या जोरावर दिल्लीचा विजयाचा मार्ग सोपा ठरला.

संबंधित बातम्या :

IPL 2021 : शिखर धवनने रचला आयपीएलमध्ये इतिहास, असा कारनामा करणारा एकटाच ‘गब्बर’!

IPL 2021 : चेन्नईचा 7 विकेट्सने धुव्वा, ‘यांच्यामुळे’ पराभव झाला म्हणत धोनी भडकला!

(csk vs dc 2021 chennai super kings captain mahendra singh dhoni fined for slow over rate against delhi capitals0