CWG 2022 : भारतील महिला हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर विरेंद्र सेहवाग ट्विटची चर्चा

वीरेंद्र सेहवागने ट्विट करून लिहिले की, भारत सध्या हॉकीमध्ये महासत्ता नसल्याने घड्याळ खराब झाले आहे. भारत महासत्ता झाल्यावर घड्याळ वेळेवर धावेल.

CWG 2022 : भारतील महिला हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर विरेंद्र सेहवाग ट्विटची चर्चा
वीरेंद्र सेहवागने याच्या आगोदरही अनेकदा समाचार घेतला आहे
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 1:42 PM

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये (England) सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेकडे (CWG2022) सगळ्या देशाचे लक्ष लागून आहे. प्रत्येक देशाला आपल्या खेळाडूने अधिक पदकं जिंकावी अशी अपेक्षा आहे. काल कुस्ती खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यामुळे आजच्या खेळाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण काल भारतील महिला हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. काल हा सामना वादात सापडला होता. ज्यावेळी वेळेचा विचार करण्यात आला त्यावेळी त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या संघाला झाला. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपट्टू विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) याने सुध्दा ट्विट करीत प्रश्न उपस्थित करीत आहे.

विरेंद्र सेहवाग ट्विट

वीरेंद्र सेहवागने ट्विट करून लिहिले की, भारत सध्या हॉकीमध्ये महासत्ता नसल्याने घड्याळ खराब झाले आहे. भारत महासत्ता झाल्यावर घड्याळ वेळेवर धावेल. सेहवागने ट्विट केले की, ‘ऑस्ट्रेलियाकडून पेनल्टी हुकली आणि पंचांनी सॉरी क्लॉक सुरू झाले नाही असे सांगितले. जोपर्यंत आपण क्रिकेटमध्ये महासत्ता नव्हतो. तोपर्यंत क्रिकेटमध्येही असेच व्हायचे. हॉकीही लवकरच तयार होणार असून सर्व घड्याळे वेळेवर सुरू होतील. आपल्या मुलींचा अभिमान आहे. तसे, सेहवागने त्याच्या ट्विट दरम्यान एक चूक केली. सेहवागने आपल्या ट्विटमध्ये हॉकीसाठी पंचांचा वापर केला, तर या खेळात पंच आहेत.

वीरेंद्र सेहवागने याच्या आगोदरही अनेकदा समाचार घेतला आहे

यांच्या आगोदर देखील वीरेंद्र सेहवागने अशा पद्धतीने अनेकदा ट्विटरच्या माध्यमातून अनेकांचा समाचार घेतला आहे. तसेच भारतीय क्रिकेट खेळाडू असोत किंवा इतर देशांचे भारतीय खेळाडूंचा त्यांनी ट्विटच्या माध्यमातून समाचार घेतला आहे. काल झालेल्या हॉकीच्या मॅचवरुन केलेलं ट्विट चांगलचं व्हायरल झालं आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.