AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी या भारतीय क्रिकेटच्या एक्स पत्नीचे मोठे विधान, म्हणाली, खूप क्रिकेट..

India vs Pakistan T20i Dubai : आज भारत-पाकिस्तानमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्याकडे जगाच्या नजरा आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, अशी अनेकांची भावना आहे. यापूर्वी दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली.

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी या भारतीय क्रिकेटच्या एक्स पत्नीचे मोठे विधान, म्हणाली, खूप क्रिकेट..
IND vs PAK
| Updated on: Sep 28, 2025 | 9:58 AM
Share

आशिया कप 2025 सुरू आहे. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळण्यासाठी भारतीय लोकांचा विरोध बघायला मिळाला. आशिया कपमध्ये आतापर्यंत दोनदा भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांच्या पुढे आले असून दोनदाही भारतीय संघाने पाकला धुळ चारली. आज परत सुपर 4 नंतर दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. 28 सप्टेंबरला म्हणजेच आज दुबईमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना रंगणार आहे. पाकिस्तान विरूद्धच्या पहिल्या 2 सामन्यांना तीव्र विरोध करण्यात आला. आता तिसऱ्यांदा भारतीय संघ पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार आहे. त्यापूर्वीच वातावरण तापल्याचे बघायला मिळतंय.

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल याचा काही दिवसांपूर्वीच धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट झाला. कोरोनाच्या काळात युजवेंद्र धनश्रीच्या प्रेमात पडला. मात्र, काही वर्षांमध्येच दोघांच्या संसारात वादळ आले आणि विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान धनश्रीने युजवेंद्र चहलकडून मोठी पोटगी घेतल्याचे सांगितले जाते. धनश्री हिने पैशांसाठी आणि प्रसिद्धीसाठी युजवेंद्र चहल याच्यासोबत लग्न केल्याचा आरोप करण्यात आला. युजवेंद्र चहलसोबतच्या घटस्फोटानंतर काही गंभीर खुलासे करताना धनश्री दिलीये.

आता धनश्री वर्मा हिने भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी क्रिकेटबद्दल मोठे विधान केले. धनश्री वर्मा सध्या राइज अॅंन्ड फॉल शोमध्ये सहभागी झालीये. यावेळी तिने क्रिकेटबद्दल मोठे भाष्य केले. धनश्री क्रिकेटबद्दल बोलताना म्हणाली की, खूप क्रिकेट बघितले. नुकताच घरात तुटलेल्या लग्नाबद्दल बोलताना धनश्री दिसली. शोमध्ये ती बऱ्याचदा आपल्या लग्नाबद्दल खुलासे करताना दिसली. यावेळी अरबाज तिला म्हणतो की, तुमचे नाते तुटल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल तुम्ही चुकीचे बोलता ते बरोबर नाही.

यादरम्यान क्रिकेट खूप जास्त बघितले असे म्हणताना धनश्री दिसली. यावेळी अर्जुन म्हणतो की, आम्ही गल्लीतील क्रिकेटबद्दल बोलत आहोत, इंटरनॅशनलबद्दल नाही. या शोमध्ये बऱ्याचदा धनश्री वर्मा ही युजवेंद्र चहलबद्दल बोलताना दिसली आहे. मात्र, युजवेंद्रच्या चाहत्यांना ही गोष्ट अजिबातच आवडली नाहीये. धनश्री वर्मा हिने घटस्फोटाच्या पोटगीबद्दलही अत्यंत मोठा खुलासा केला आहे.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.