
आशिया कप 2025 सुरू आहे. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळण्यासाठी भारतीय लोकांचा विरोध बघायला मिळाला. आशिया कपमध्ये आतापर्यंत दोनदा भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांच्या पुढे आले असून दोनदाही भारतीय संघाने पाकला धुळ चारली. आज परत सुपर 4 नंतर दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. 28 सप्टेंबरला म्हणजेच आज दुबईमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना रंगणार आहे. पाकिस्तान विरूद्धच्या पहिल्या 2 सामन्यांना तीव्र विरोध करण्यात आला. आता तिसऱ्यांदा भारतीय संघ पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार आहे. त्यापूर्वीच वातावरण तापल्याचे बघायला मिळतंय.
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल याचा काही दिवसांपूर्वीच धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट झाला. कोरोनाच्या काळात युजवेंद्र धनश्रीच्या प्रेमात पडला. मात्र, काही वर्षांमध्येच दोघांच्या संसारात वादळ आले आणि विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान धनश्रीने युजवेंद्र चहलकडून मोठी पोटगी घेतल्याचे सांगितले जाते. धनश्री हिने पैशांसाठी आणि प्रसिद्धीसाठी युजवेंद्र चहल याच्यासोबत लग्न केल्याचा आरोप करण्यात आला. युजवेंद्र चहलसोबतच्या घटस्फोटानंतर काही गंभीर खुलासे करताना धनश्री दिलीये.
आता धनश्री वर्मा हिने भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी क्रिकेटबद्दल मोठे विधान केले. धनश्री वर्मा सध्या राइज अॅंन्ड फॉल शोमध्ये सहभागी झालीये. यावेळी तिने क्रिकेटबद्दल मोठे भाष्य केले. धनश्री क्रिकेटबद्दल बोलताना म्हणाली की, खूप क्रिकेट बघितले. नुकताच घरात तुटलेल्या लग्नाबद्दल बोलताना धनश्री दिसली. शोमध्ये ती बऱ्याचदा आपल्या लग्नाबद्दल खुलासे करताना दिसली. यावेळी अरबाज तिला म्हणतो की, तुमचे नाते तुटल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल तुम्ही चुकीचे बोलता ते बरोबर नाही.
यादरम्यान क्रिकेट खूप जास्त बघितले असे म्हणताना धनश्री दिसली. यावेळी अर्जुन म्हणतो की, आम्ही गल्लीतील क्रिकेटबद्दल बोलत आहोत, इंटरनॅशनलबद्दल नाही. या शोमध्ये बऱ्याचदा धनश्री वर्मा ही युजवेंद्र चहलबद्दल बोलताना दिसली आहे. मात्र, युजवेंद्रच्या चाहत्यांना ही गोष्ट अजिबातच आवडली नाहीये. धनश्री वर्मा हिने घटस्फोटाच्या पोटगीबद्दलही अत्यंत मोठा खुलासा केला आहे.