कॅप्टन कूल नागपुरात संतापला, झाडाझुडपातून स्टेजवर पोहोचला!

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

सुनिल ढगे, टीव्ही9 मराठी, नागपूर : टीम इंडियाचा आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनीला नागपुरातील कार्यक्रम अर्धवट सोडून जाण्याची वेळ आली. नागपूरच्या गायकवाड पाटील इंटरनॅशनल शाळेत ‘महेंद्र सिंह धोनी रेसिडेंशिअल क्रिकेट अकादमी’च्या उद्घाटनाला धोनी आला होता. मात्र या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाल्याने, दोन तासांचा कार्यक्रम अर्धवट सोडून धोनी माघारी परतला. एसजीआर या संस्थेमार्फत आज नागपूरच्या गायकवाड पाटील इंटरनॅशनल […]

कॅप्टन कूल नागपुरात संतापला, झाडाझुडपातून स्टेजवर पोहोचला!
Follow us on

सुनिल ढगे, टीव्ही9 मराठी, नागपूर : टीम इंडियाचा आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनीला नागपुरातील कार्यक्रम अर्धवट सोडून जाण्याची वेळ आली. नागपूरच्या गायकवाड पाटील इंटरनॅशनल शाळेत ‘महेंद्र सिंह धोनी रेसिडेंशिअल क्रिकेट अकादमी’च्या उद्घाटनाला धोनी आला होता. मात्र या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाल्याने, दोन तासांचा कार्यक्रम अर्धवट सोडून धोनी माघारी परतला.

एसजीआर या संस्थेमार्फत आज नागपूरच्या गायकवाड पाटील इंटरनॅशनल शाळेच्या आवारात ‘महेंद्रसिंह धोनी रेसिडेंशिअल क्रिकेट अकादमी’ उभारण्यात आली आहे. या अकादमीचं उद्घाटन करण्यासाठी धोनी आला होता.  मात्र उद्घाटनप्रसंगी झालेला गोंधळ आणि आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे नाराज होऊन धोनीने कार्यक्रम अर्ध्यावर सोडला.

महेंद्रसिंह धोनी हा भारतीय क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. भारतात त्याच्या चाहत्यांची कमी नाही. त्याला बघण्यासाठी लोक मैदानातच नाही, तर तो ज्या कार्यक्रमात जाईल तिथे गर्दी करतात. असंच काहीसं नागपुरात झालं. धोनी येणार असल्याचं कळताच लोकांनी कार्यक्रमाला गर्दी केली. धोनीचं आगमन मुख्य मार्गावरुन स्टेजपर्यंत होणार होते, मात्र गर्दीमुळे ते शक्य झाले नाही. परिणामी धोनीला मागच्या गवताच्या आणि काटेरी झुडूपाच्या रस्त्याने स्टेजपर्यंत पोहोचावे लागले.

यानंतर स्टेजजवळ मीडियाचे कॅमेरे आणि हौशी मोबाईल शूटिंगवाल्यांनी धोनीचा पाठलाग केल्याने तो संतापला. तर दुसरीकडे त्याच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या खासगी सुरक्षा एजन्सीच्या बाऊन्सर्सने लोकांसोबत धक्काबुक्की केली. त्यामुळे धोनी काहीसा नाराज झाला. यासर्व प्रकारामुळे धोनीने हा कार्यक्रम अर्ध्यावर सोडला. आपल्या छोटेखानी भाषणात त्याने उपस्थित पालकांना कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या लहान मुलांना सांभाळा असे आवाहन केले.

या कार्यक्रमात धोनी 125 मुलांचे दोन तास मार्गदर्शन करणार होता. त्यानंतर तो रेसिडेंशिअल क्रिकेट अकादमीच्या खेळाडूंसोबत मैदानावर जाणार होता, मात्र नाराज धोनीने कार्यक्रम अर्ध्यावर सोडत थेट हॉटेल गाठले.