AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fifa World Cup 2026: भरगच्च स्टेडियममध्ये ट्रम्प यांची फजिती, फिफा विश्वचषकाच्या ट्रॉफी प्रदान सोहळ्याचा Video Viral

फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाला 1-0 ने पराभूत करून आपली दुसरी विश्वचषक ट्रॉफी जिंकली. आता यानंतर जेव्हा ट्रॉफीप्रदान सोहळा होत होता तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे केले त्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.

Fifa World Cup 2026: भरगच्च स्टेडियममध्ये ट्रम्प यांची फजिती, फिफा विश्वचषकाच्या ट्रॉफी प्रदान सोहळ्याचा Video Viral
donald trump at fifa world cup final 2026
| Updated on: Jul 20, 2026 | 9:14 AM
Share

फिफा विश्वचषकात स्पेनच्या तरुण संघाची कामगिरी इतकी प्रभावी होती  की शेवटी फिफा विश्वचषकाच्या ट्रॉफीवर नाव कोरलेच. आपला शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या मेस्सीच्या डोळ्यात अश्रू होते. दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून स्पेन फुटबॉल विश्वाच्या शिखरावर पोहोचला आहे. फेरान टोरेसने या विश्वचषकातील आपला पहिला गोल केला, जो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोल मानला जातो. या गोलमुळे स्पेनने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनाला 1-0 ने हरवले. गोल, बचाव आणि डावपेचांच्या पलीकडे, यजमान देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून अंतिम सामन्याला उपस्थित असलेले डोनाल्ड ट्रम्प देखील चर्चेत राहिले. जेव्हा स्पेनच्या संघाला ट्रॉफी दिली जाणार होती तेव्हा ट्रम्प यांनी जे केले त्याच्या कृतीचे जोरदार चर्चा होत आहे.

फिफा विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनावर स्पेनच्या 1-0 विजयानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ट्रॉफी प्रदान सोहळ्यादरम्यान मंचावरच थांबले. खरंतर ट्रॉफी दिल्यानंतर तिथून निघून जाणं अपेक्षित होत पण त्यांनी तसं केले नाही. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आणि कॅनडाचे पंतप्रधान यांसारखे व्हीआयपी पाहुणे ट्रॉफी प्रदान केल्यानंतर लगेचच मंचावरून निघून गेले, परंतु ट्रम्प यांनी पदके आणि ट्रॉफी सुपूर्द केल्यानंतरही मुद्दाम फुटेज आणि कॅमेऱ्यांसाठी मंचावरच थांबण्याचा निर्णय घेतला.

स्पेनचा कर्णधार रोड्रीला ट्रॉफी प्रदान केल्यानंतर, संघ जल्लोष सुरू होण्याची वाट पाहत असताना, ट्रम्प खेळाडूंमध्ये उजवीकडे सरकले. परिस्थिती इतकी अस्वस्थ करणारी झाली की, फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांना स्वतः हस्तक्षेप करून त्यांना निघून जाण्याचा इशारा करावा लागला. अखेरीस, जियानी इन्फँटिनो यांनी ट्रम्प यांच्याकडे जाऊन त्यांना बाहेर काढले.

यानंतर स्पेनचे खेळाडूंनी ट्रॉफी उंचावली आणि सेलिब्रेशन केले, तेव्हा ट्रम्प तिथे इन्फँटिनो यांच्याशी गप्पा मारत उभे होते. ट्रम्प यांनी त्यांच्या पुनर्निवडणुकीनंतर अनेक क्रीडा स्पर्धांना हजेरी लावली आहे. गेल्या वर्षी, त्यांनी सुपर बाउल, टेनिसची यूएस ओपन, डेटोना 500 आणि गोल्फच्या रायडर कपला हजेरी लावली होती. या वर्षी, त्यांनी अनेक गोल्फ स्पर्धा, कॉलेज फुटबॉल राष्ट्रीय चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि एनबीए फायनल्सच्या तिसऱ्या सामन्याला हजेरी लावली, जिथे न्यूयॉर्क निक्सच्या स्थानिक चाहत्यांनी त्यांची हुर्यो केली.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर