
इंग्लंडने T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नवीन इतिहास रचला आहे. आपल्या स्फोटक बॅटिंगच्या बळावर इंग्लंडने T20 इंटरनॅशनलमध्ये पहिल्यांदा 300 धावांचा आकडा पार केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या T20 मॅचमध्ये हा विक्रम रचला. फिल सॉल्टच तडाखेबंद शतक आणि जॉस बटलरच्या स्फोटक इनिंगच्या बळावर इंग्लंडने फक्त 2 विकेट गमावून 304 धावा केल्या. सोबतच इंग्लंडने T20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड मोडला. T20 इंटरनॅशनलमध्ये तिसऱ्यांदा कुठल्या टीमने 300 धावांचा आकडा पार केला आहे. पण दोन मोठ्या संघांमध्ये पहिल्यांदा असं घडलय.
मॅन्चेस्टरच्या प्रसिद्ध एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये 12 सप्टेंबर 2025 या तारखेचा कायमसाठी इतिहास आणि रेकॉर्ड बुकमध्ये समावेश झाला आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी या मैदानावर सर्वात स्फोटक अंदाज दाखवत मागचे अनेक रेकॉर्ड मोडले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या T20 सामन्यात पहिली फलंदाजी करत इंग्लंडने 20 ओव्हर्समध्ये 304 धावा ठोकल्या. या रेकॉर्डचा पाया रचला जॉस बटलरने (86). या ऐतिहासिक पायावर कळस चढवण्याच काम केलं, फिल सॉल्टने.
फक्त 39 चेंडूत शतक
जागतिक क्रिकेटमध्ये सॉल्ट आणि बटल खतरनाक ओपनिंग जोडी मानली जाते. त्यांनी फक्त 7.5 ओव्हर्समध्ये 126 धावांची तुफानी भागीदारी केली. अशी जबरदस्त सुरुवात दिली की, प्रत्येकाच्या ओठांवर एकच चर्चा होत, 300 धावांचा रेकॉर्ड मोडणार का?. सॉल्ट आणि अन्य फलंदाजांनी हा टप्पा पार होईल हे सुनिश्चित केलं. सॉल्टने इंग्लंडसाठी फक्त 39 चेंडूत वेगवान टी 20 शतक झळकावलं. 20 व्या ओव्हरमध्ये कगिसो रबाडाच्या चेंडूवर इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रूकने 1 धाव घेऊन 300 रन्सचा टप्पा ओलांडला.
नेपाळच्या टीमने केलेला रेकॉर्ड
टी 20 इंटरनॅशनलमध्ये फक्त तिसऱ्यांदा 300 धावांचा टप्पा पार झाला आहे. सर्वातआधी नेपाळच्या टीमने ही कमाल 27 सप्टेंबर 2023 रोजी केली होती. त्यांनी मंगोलिया विरुद्ध 314 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर 23 ऑक्टोंबर 2024 रोजी झिम्बाब्वेने हा आकडा गाठलेला. गाम्बिया विरुद्ध त्यांनी 344 धावांचा नवीन रेकॉर्ड रचलेला. पण इंग्लंडने जे केलं, तसं पहिल्यांदाच झालं आहे.
इंग्लंडच्याच नावावर ODI मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड
पहिल्यांदा ICC ची फुल मेंबर टीम (टेस्ट क्रिकेट दर्जा प्राप्त) संघाने एका डावात 300 धावा केल्या आहेत. याआधी ICC मेंबरमध्ये सर्वाधिका धावांचा रेकॉर्ड टीम इंडियाच्या नावावर होता. त्यांनी 2024 मध्ये बांग्लादेश विरुद्ध 297 धावांचा स्कोर केलेला. इंग्लंडच्याच नावावर ODI क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्कोरचा रेकॉर्ड आहे. नेदरलँड विरुद्ध त्यांनी 498 धावा केल्या होत्या.
30 चौकार आणि 18 षटकार
इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात 30 चौकार आणि 18 षटकार लगावले. T20 मध्ये फुल मेंबर टीमने सर्वाधिक बाऊंड्री मारण्याचा हा रेकॉर्ड आहे. झिम्बाब्वेने 344 धावा केलेल्या त्या मॅचमध्ये 57 वेळा चेंडू सीमारेषेपार पाठवलेला.