Virat Kohli Fight Video : ‘काय करायचे ते मला सांगू नकोस..’, विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो मैदानातच भिडले

| Updated on: Jul 03, 2022 | 6:15 PM

विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात मैदानावरच जोरदार वादावादी झाली. अखेर पंचांना दोघांच्या भांडणात हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही पंचांनी कोहली आणि बेअरस्टो यांना शांत राहण्यास सांगितले. त्यानंतर प्रकरण थोडे शांत झाले.

Virat Kohli Fight Video : काय करायचे ते मला सांगू नकोस.., विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो मैदानातच भिडले
विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो मैदानातच भिडले
Image Credit source: Google
Follow us on

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटी (Edgbaston Test) रोमांचक ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाची काहीशी वादावादीतून झाली आहे. इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो (Johnny Bairstow) आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात मैदानावर वाद झाला. विराट कोहली ‘काय करायचे ते मला सांगू नकोस, तोंड बंद करून बॅट कर’, असे बेअरस्टोला म्हणाला. यानंतर पंचांना हस्तक्षेप करुन वाद मिटवावा लागला. कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांत भारतीय संघाने या सामन्यात आघाडी घेतली होती.

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीदरम्यान वाद

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स क्रीजवर आले. खेळ सुरू झाल्यानंतर काही वेळातच मोहम्मद शमी गोलंदाजी करत असताना विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात काही संवाद झाला. जॉनी बेअरस्टोकडून एक बॉल बीट झाला होता, त्यानंतर स्लिपमध्ये उभा असलेला विराट कोहली काहीतरी म्हणाला. यावर जॉनी बेअरस्टोने प्रत्युत्तर देताच विराट कोहली त्याच्या दिशेने सरसावला. यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. यावेळी काय करायचे ते मला सांगू नकोस, तोंड बंद करून बॅट कर, असे कोहली बेअरस्टोला म्हणाला.

हे सुद्धा वाचा

पंचांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला

विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात मैदानावरच जोरदार वादावादी झाली. अखेर पंचांना दोघांच्या भांडणात हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही पंचांनी कोहली आणि बेअरस्टो यांना शांत राहण्यास सांगितले. त्यानंतर प्रकरण थोडे शांत झाले. मोहम्मद शमीचे ओव्हर संपल्यानंतर ब्रेकच्या दरम्यान विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात चर्चा झाली आणि दोघेही एकमेकांना स्माईल देताना दिसले. आदल्या दिवशी विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टोचा फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दोघेही मस्करी करत पॅव्हेलियनच्या दिशेकडे चालले होते. विराट कोहलीची आक्रमक शैली मैदानावर अनेकदा पाहायला मिळते आणि चाहत्यांनाही ती खूप आवडते.

एजबॅस्टन कसोटीत भारत आघाडीवर

एजबॅस्टन कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे, भारताने प्रथम फलंदाजी करताना 416 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडून ऋषभ पंतने 146 आणि रवींद्र जडेजाने 104 धावा केल्या. नंतर टीम इंडियाने गोलंदाजीतही चमत्कारिक कामगिरी केली आणि 83 धावांवर इंग्लंडच्या पाच विकेट्स सोडल्या. या मालिकेत भारत आधीच 2-1 ने आघाडीवर आहे, जर टीम इंडियाने हा सामना जिंकला किंवा ड्रॉ केला तर मालिका भारताच्या नावावर होईल. (Englands Johnny Bairstow and former India captain Virat Kohli argue on the field in the Edgbaston Test)