
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज बिहार दौऱ्यावर आहेत. भारताचा स्टार क्रिकेटर वैभव सूर्यवंश याची त्यांनी पाटणा येथील जयप्रकाश नारायण विमानतळावर भेट घेतली. यावेळी वैभव याचे आई-वडील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः वैभव आणि त्याच्या कुटुंबाच्या या भेटीविषयीची छायाचित्र अधिकृत सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केली. या पोस्टवर अवघ्या काही मिनिटात लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला.
14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने या आयपीएल हंगामात धमाका केला. त्याच्या स्फोटक फलंदाजीची चर्चा भारताताच नाही तर जगभर होत आहे. वैभव हा बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवाशी आहे. त्याने राजस्थान रॉयल्स संघाकडून आयपीएल सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्याने गुजरात टायटल्सविरोधात 35 चेंडूत झंझावती शतक ठोकले होते. त्याच्या या खेळीने जगाचे लक्ष वेधले होते. तो आयपीएलमध्ये शतक ठोकणारा सर्वात तरूण फलंदाज ठरला आहे. आयपीएलमध्ये वेगवान शतक ठोकण्याचा किताब पण त्याच्या डोईवर आला आहे. त्याने यूसुफ पठाणचा रेकॉर्ड तोडला आहे.
At Patna airport, met the young cricketing sensation Vaibhav Suryavanshi and his family. His cricketing skills are being admired all over the nation! My best wishes to him for his future endeavours. pic.twitter.com/pvUrbzdyU6
— Narendra Modi (@narendramodi) May 30, 2025
वैभव याच्यावर कौतुकाचा वर्षाव
वैभव सूर्यवंशी या 14 वर्षीय खेळाडूने आयपीएलमध्ये उत्तुंग कामगिरी केली. आज त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीची छायाचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स खात्यावर शेअर केली. त्याच्या क्रिकेटमधील कौशल्याची संपूर्ण देशात कौतुक होत असल्याचे पंतप्रधान यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी, कामगिरीसाठी माझ्याकडून शुभेच्छा असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
वैभवची आयपीएलमधील कामगिरी
वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2025 मध्ये दमदार कामगिरी केली. त्याने 7 सामन्यांमध्ये 252 धावा केल्या. वैभवने या आयपीएल हंगामात एक शतक आणि एक अर्ध शतक ठोकले. त्याची नुकतीच भारताच्या 19 वर्षाच्या खालील संघात पण निवड झाली आहे. वैभवने अवघ्या 14 व्या वर्षीच मोठे धमाके केले आहेत. तो अंडर 19 आशिया कप 2024-25 मध्ये गाजला होता. सूर्यवंशी बिहार राज्याचे प्रतिनिधित्व करतो.