फुटबॉल क्लब बायर्न महाराष्ट्र कप, राज्यातील 20 मुलांचं नशीब चमकणार, थेट जाणार जर्मनीला

| Updated on: Feb 07, 2023 | 6:44 PM

महाराष्ट्रातून 20 मुलांची निवड होणार आहे. एफ सी बायर्न क्लब या मुलांना जर्मनीला स्वखर्चाने घेऊन जाणार आहे.

फुटबॉल क्लब बायर्न महाराष्ट्र कप, राज्यातील 20 मुलांचं नशीब चमकणार, थेट जाणार जर्मनीला
Follow us on

मुंबई : फुटबॉल क्लब बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेच्या लोगोचं अनावरण आज (7 फेब्रुवारी) मंत्रालयात करण्यात आलं. या लोगो अनावरणाच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्रीडामंत्री गिरीश महाजन आणि एफसी बायर्न क्लबचे महत्त्वाचे सदस्य उपस्थित होते. (F.C. Bayern Maharashtra Cup Football) या 14 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेला 8 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचं आयोजन हे जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय असं आहे. या स्पर्धेतील सर्वोत्तम 20 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. या 20 स्टार खेळाडूंना म्युनिच इथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

असं आहे स्पर्धेचं स्वरुप
8 फेब्रुवारी 2023 पासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. तर राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन हे 27 फेब्रुवारी ते 4 मार्च 2023 पर्यंत या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी पुणे इथे फुटबॉस मैदानावर होणार आहे.

2008 मध्ये 71 देशांच्या सहभागासह प्रतिष्ठित राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील युवकांमध्ये क्रीडा गुणवत्ता वाढविण्यासाठी भविष्यकालीन आणि प्रगतीशील पार पडल्या. तेव्हापासून, शासनाचा क्रीडा विभाग. महाराष्ट्र नियमितपणे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करत आहे.सुरु आहे,याद्वारे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक नामांकित खेळाडूंची महाराष्ट्रातील तरुणांमधील क्रीडा प्रतिभा विकसित करण्यासाठी क्रीडा प्रबोधिनी देखील गत 26 वर्षांपासून ओळख करून दिली आहे.

क्रीडा क्षेत्र हे दैनंदिन नव कल्पनांचे क्षेत्र आहे, त्यामुळे या क्षेत्रात पारंपारिक गोष्टींवर भर देण्यापेक्षा क्रीडा विज्ञान क्षेत्राकडे वाटचाल करणे आवश्यक आहे, त्याच सोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या क्रीडा विषयक क्लब सोबत देखील करार करुन त्यांचे क्रीडा मार्गदर्शक राज्यातील खेळाडूंना मार्गदर्शन करतील अशी व्यवस्था उभारणे आवश्यक आहे.

क्लब बायर्न क्लबविषयी थोडक्यात
फुटबॉल क्लब बायर्न हा जगातील अग्रगण्य आणि लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक आहे, जो आजमितीस जर्मन फुटबॉलमध्ये राष्ट्रीय लीग मध्ये 32 वेळा विजेता ठरलेला आहे.तसेच इतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांमध्ये चॅम्पियन्स लीग 06 वेळा, UEFA कप 2 वेळा अशा प्रकारची कारकीर्द आहे.
फुटबॉल क्लब बायर्न व क्रीडा संचालनालय हे अशाच बाबींसाठी,त्यातील महत्वाच्या खालील बाबींसाठी करार करण्यात आलेला आहे. प्रशिक्षक, खेळाडू, कर्मचारी यांच्यासाठी एक मजबूत व्यासपीठ तयार करून भारतातील फुटबॉलच्या वाढीस मदत करणे.

राज्यात अधिक अत्याधुनिक क्रीडा परिसंस्था निर्माण करणे. आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळ विकसित करण्यासाठी संसाधने आणि तज्ञांचे कौशल्य विकसित करणे. प्रतिभावान प्रशिक्षकांच्या नवीन पिढीचा विकास आणि सक्षमीकरण करणे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर फुटबॉल खेळ शिकण्यासाठी गुणवत्ता,विविधता आणि प्रवेश योग्यता प्रदान करणे. फुटबॉल आणि शिक्षणाद्वारे तरुणांचे जीवन सुधारणे. विविध कोचिंग आणि संशोधन मॉड्यूल्सद्वारे फुटबॉलचे ज्ञान आणि समज वाढवणे. तळागाळातील फुटबॉल खेळाला चालना देणे.

या करारनाम्याद्वारे फुटबॉल क्लब बायर्न हा राज्यातून निवडलेल्या 20 खेळाडूंना म्युनिक येथे जाणे-येणे, विकसित करण्याची संधी मिळणार आहे. तेथील फूटबॉल खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने पाहण्याची,सराव करण्याची,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसोबत कौशल्य राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल,राज्यात फुटबॉल खेळाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होऊ शकतील,तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होण्याची प्रक्रिया सुरु होईल, ही या करारनाम्याची फलनिष्पत्ती ठरु शकेल.