FIFA World Cup 2022: कतारमध्ये बिअरसाठी लांबच लांब रांगा, चाहत्यांची बिअरसाठी प्रतीक्षा, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे ?

कतारमध्ये दारू आणि बिअरच्या विक्रीवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत

FIFA World Cup 2022: कतारमध्ये बिअरसाठी लांबच लांब रांगा, चाहत्यांची बिअरसाठी प्रतीक्षा, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे ?
FIFA World Cup 2022
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 22, 2022 | 3:00 PM

मुंबई :FIFA विश्वचषक 2022 सुरु झाला आहे. खेळाडू आपल्या मित्र परिवारांसह कतारमध्ये (Qatar) दाखल झाले आहेत. अनेकांनी तिथल्या अलिशान जहाजमध्ये मुक्कामाला आहेत. विशेष म्हणजे काही जणांनी विश्वचषक (FIFA World Cup 2022)पुर्ण होईपर्यंत जहाज बुकींग केल्याची माहिती मिळाली आहे. कतारमध्ये FIFA विश्वचषक स्पर्धेचं चांगलं आयोजन करण्यात आलं आहे. परंतु चाहत्यांना बियर घेण्यासाठी रांग लावावी लागत असल्यामुळे चाहत्यांचा मूड खराब झाला आहे.

कतारमध्ये दारू आणि बिअरच्या विक्रीवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत, त्यामुळे चाहतेच नाही तर आयोजकही संपातल्याचे पाहायला मिळत आहे. कतारमध्ये सध्या अधिक गर्मी आहे, त्यामुळे तिथं अनेक चाहत्यांची पसंती बियरला आहे. तसेच एका बियरसाठी 1150 रुपये मोजावे लागत असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.

विश्वचषक स्पर्धेसाठी फिफाने बुडवेझरला कंपनीसोबत करार केला आहे. त्यामुळे तिथं बुडवेझर बिअर मिळत आहे. विशेष म्हणजे मॅच सुरु होण्याच्या काही मिनिटे आगोदर बिअर मिळत असल्याने चाहत्यांची मोठी गर्दी तिथं होतं आहे. अधिक धक्के खाल्ल्यानंतर चाहत्यांना बियर मिळत आहे.

कतार देशात दारु आणि बियर विक्रीला बंदी आहे. विश्वचषक सुरु होण्याआगोदर एक दिवस काही महत्त्वाच्या ठिकाणी बिअर विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मैदानात किवा मैदानाच्या बाहेर मद्यविक्रीला परवानगी नसल्याने चाहत्यांना त्रास होतं आहे.