भारत-पाक सामन्यापूर्वीच पाक खेळाडुंवर आर्थिक संकट! PCB चा मोठा निर्णय

PCB big decision : पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंवर आता थेट कारवाई करण्यात येणार आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. बाबार आजम आणि शाहीन शाह अफरिदी यांना त्याचा चांगलाच फटका बसणार आहे. काय आहे अपडेट

भारत-पाक सामन्यापूर्वीच पाक खेळाडुंवर आर्थिक संकट! PCB चा मोठा निर्णय
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| Updated on: Aug 16, 2025 | 10:02 AM

Pakistan Cricket Board : पाकिस्तान क्रिकेट संघ हा गेल्या काही दिवसांपासून यशासाठी झुंजत आहे. त्यातच भारत आणि पाकचा सामना सुद्धा होईल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या उत्पन्नावर थेट परिणाम होणार आहे. त्यातच खेळाडुंची खराब कामगिरीमुळे बोर्ड संतापले आहे. बांगलादेशाकडून पराभव, वेस्टइंडिज सारख्या कमी रॅंकिंग असलेल्या संघासमोर गुडघे टेकवल्याने पाक संघावर टीका होत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) खेळाडुंना धडा शिकवण्याचे ठरवले आहे. बोर्ड वरिष्ठ खेळाडुंच्या मोठ्या वेतनात कपात करणार आहे. यामध्ये बाबर आजम आणि शाहीन शाह अफरिदी या सारख्या खेळाडूंवर आता आर्थिक संकट येणार आहे.

PCB का नाराज?

PCB मध्ये गेल्या काही दिवसांपासून खेळाडूंच्या कामगिरीवर गंभीर चर्चा सुरू आहे. भारीभक्कम पॅकेज देऊन ही खेळाडुंच्या प्रदर्शनात कोणताच बदल होत नसल्याने पीसीबी संतापली आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेटचा आलेख सातत्याने खालावत आहे. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट मध्ये मोठा फेरबदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये खेळाडूंना देण्यात येणाऱ्या अनुषांगिक लाभांवर आणि वेतन कपातीचा निर्णय घेण्यात येणार आहे.

केंद्रीय कराराद्वारे पीसीबी खेळाडूंना अधिक कमाई करण्यासाठी आयसीसीच्या उत्पन्नातील 3 टक्के रक्कम देते. पण आता पाकिस्तान बोर्ड ही रक्कम थांबवण्याचा विचार करत आहे. जर असे झाले तर खेळाडूंच्या कमाईवर त्याचा थेट परिणाम दिसून येईल. त्यांना मोठा आर्थिक फटका बसेल. त्यांच्या वेतनात मोठी कपात होईल.

किती नुकसान होणार खेळाडूंचे?

सध्याच्या केंद्रीय करारानुसार, कसोटी खेळण्यासाठी खेळाडूंना जवळपास 12 लाख रुपये मिळतात. तर एकदिवसीय सामन्यांसाठी त्यांना 6 लाख रुपये मिळतात. तर T20I खेळण्यासाठी जवळपास 4 लाख रुपये मिळतात. याशिवाय अ श्रेणीत खेळणाऱ्या क्रिकटर्सला दरमहा 6.57 लाख पाकिस्तानी रुपये मिळतात. या श्रेणीत सध्या केवळ बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांचा समावेश आहे. जर त्यांची ICC चा वाटा हटवला. तर सर्वाधिक फटका या दोन खेळाडूंनाच बसणार आहे. ब श्रेणीतील खेळाडुंना 4.55 दशलक्ष रुपये, तर क श्रेणीतील खेळाडूंना 20.3 दशलक्ष रुपये आणि ड श्रेणीतील खेळाडूंना 1.26 दशलक्ष रुपये मिळतात हा सर्व पैसा आयसीसीकडून येतो. या रक्कमेलाच कात्री लावण्यात येणार असल्याने खेळाडूंना फटका बसण्याची शक्यता आहे.