भयंकर आणि किळसवाणं! 8 वर्षापासून एकच अंडरवियर घालून खेळतोय हा खेळाडू; नाव आणि कारण ऐकून घामच फुटेल…

ब्राझिलियन फुटबॉलपटू एडरसन गेली 8 वर्षे प्रत्येक सामन्यात एकच अंडरवेअर वापरतो. मँचेस्टर सिटीचा गोलकीपर असलेला एडरसन याला विजयाचे आपले खास गुपित मानतो. अनेक ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता. खेळाडूंच्या अंधश्रद्धांमध्ये एडरसनचा हा विचित्र टोटका सध्या खूप चर्चेत आहे आणि लोक त्याचे यश पाहून थक्क झाले आहेत.

भयंकर आणि किळसवाणं! 8 वर्षापासून एकच अंडरवियर घालून खेळतोय हा खेळाडू; नाव आणि कारण ऐकून घामच फुटेल...
Sports
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 17, 2026 | 9:11 AM

खेळताना एखादी गोष्ट घडली आणि त्यानंतर विजय मिळाला तर खेळाडू त्या गोष्टीला चिपकून बसतात. त्यांना ती गोष्ट शुभ वाटते आणि तीच कृती ते वारंवार करू लागतात. क्रिकेटपासून ते फुटबॉलपर्यंतच्या प्रत्येक खेळातील खेळाडूंच्या स्वत:च्या म्हणून काही अंधश्रद्धा आहेत. एक क्रिकेटपटू तर मॅच सुरू होण्यापूर्वी ड्रेसिंग रुममधील सर्व टॉयलेटची झाकणं लावून घ्यायचा. असं केल्याने आपण चांगला परफॉर्मन्स करू असं त्याला वाटायचं. ब्राझिलियन फुटबॉलरच्या बाबतही असंच काही तरी घडलंय. त्याता टोटका सध्या चर्चेत आहे. तो 8 वर्षापासून प्रत्येक सामन्यावेळी एकच अंडरवियर घालून मैदानात उतरतोय. मँचेस्टर सिटीचा गोलकिपर आणि ब्राझिलियन फुटबॉलर एडरसनचा हा टोटका आहे. गेल्या वर्षी त्याने एका मुलाखतीत ही गोष्ट उघड केली. आजही त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या मुलाखतीत एडरसनने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. 2017 मध्ये तो मँचेस्टर सिटीमध्ये सामिल झाला होता. त्यानंतर त्याने सतत 8 वर्ष एकच अंडरवियर प्रत्येक सामन्याच्यावेळी घातली. एरव्ही दुसरी अंडरवियर वापरायचा. पण मॅच असेल तेव्हा ही एक खास अंडरवियर घालूनच तो मैदानात उतरायचा. विशेष म्हणजे या सामन्यांमध्ये त्याला यशही मिळालेलं आहे आणि त्याने असंख्य ट्रॉफीही जिंकल्या आहेत.

उत्तर दिलं अन् दिलखुलास हसला

BBC Match of the Day मध्ये त्याने हे आतलं गुपित सांगितलंय. माझ्या यशामागे एकच टोटका आहे. तो म्हणजे मी प्रत्येक सामन्यात एकच अंडरवियर घालतो. ती एक अंडरवियर मॅचसाठीच वापरतो. त्याचा हा खुलासा ऐकून मुलाखत घेणारा अवाकच झाला. त्याने एडरसनला फिरकी घेणारा पुढचा सवाल टाकला. गेल्या आठ वर्षापासून तू एकच अंडरवियर वापरतो. याचा अर्थ आता त्या अंडरवियरचा शेप खराब झाला असेल. त्यावर एडरसननेही तितक्याच तत्परतेने नाही असं उत्तर दिलं आणि दिलखुलासपणे हसू लागला.

किती मॅच खेळला

एडरसन आंतरराष्ट्रीय सामन्यातही खेळला आहे. 2018मध्ये त्याने चिलीच्या विरोधात डेब्यू केलं होतं. या सामन्यात ब्राझिलचा संघ 3-0 ने विजयी झाला होता. एडरसनला 2022मध्ये झालेल्या फिफा वर्ल्ड कपमध्येही निवडण्यात आलं होतं. फिफा वर्ल्ड कपमध्ये ब्राझिलचा संग क्वॉर्टर फायनलपर्यंत पोहोचला होतो. पण या संपूर्ण मॅचमध्ये एडरसनला केवळ एकच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. ब्राझिलसाठी त्याने आतापर्यंत 31 मॅच खेळल्या आहेत. तर मँचेस्टर सिटीसाठी त्याने 276 सामने खेळले आहेत.

Follow Us