महिला क्रिकेटरला पाठवला सेक्सी फोटो, Kissing…क्रिकेट कोच कर्तव्य विसरला, नको त्या कृत्यांमुळे चर्चेत

या कोचवर दोन ज्यूनियर महिला सहकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. कोचने सुद्धा त्याच्याविरोधातील आरोप स्वीकारले आहेत.

महिला क्रिकेटरला पाठवला सेक्सी फोटो, Kissing...क्रिकेट कोच कर्तव्य विसरला, नको त्या कृत्यांमुळे चर्चेत
Cricket
Image Credit source: Dan Istitene/Getty Images
| Updated on: Aug 07, 2025 | 10:09 AM

क्रिकेट जगतातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे प्रत्येक जण हैराण आहे. एका कोचवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कोचवर दोन ज्यूनियर महिला सहकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. कोचने सुद्धा त्याच्याविरोधातील आरोप स्वीकारले आहेत. त्यामुळे त्याला इंटरनॅशनल क्रिकेट डिसिप्लिन पॅनलमधून निलंबित करण्यात आलं आहे.

एका माजी काऊंटी क्रिकेट कोचला लैंगिक अत्याचाराच्या आरोपामुळे नऊ महिन्यांसाठी क्रिकेटमधून निलंबित करण्यात आलं आहे. इंटरनॅशनल क्रिकेट डिसिप्लिन पॅनलने हा निर्णय घेतला आहे. कोचसाठी व्यावसायिक आचरणाचे काही नियम आहेत, त्याचं उल्लंघन केल्याच त्याने मान्य केलं. या दोन महिला सहकाऱ्यांना अश्लील फोटो पाठवणं आणि क्लब चेजिंग रुममध्ये एका महिलेच चुंबन घेण्याचा प्रयत्न करणं असे आरोप या कोचवर होते.

नाव का जाहीर केलं नाही?

कोचचं नाव सार्वजनिक करायचं नाही, असा इंटरनॅशनल क्रिकेट डिसिप्लिन पॅनलने निर्णय घेतला. कोचच्या आरोग्याशी संबंधित काही कारणं आणि नाव समोर आल्यास गंभीर नुकसानीचा धोका असल्याने डिसिप्लिन पॅनलने हा निर्णय घेतला आहे. कोचला त्याच्या आचरणामुळे आधीच नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. तेव्हापासून तो क्रिकेटमध्ये कार्यरत नाहीय.

तिथे चुंबन घेण्याचा प्रयत्न

कोचने एका पीडितेला अश्लील मेसेज पाठवलेला. पीडितेने या बद्दल स्पष्टपणे सांगितल्यानंतर त्याने असे मेसेज पाठवणं बंद केलं. पण पुन्हा काही दिवसांनी अश्लील मेसेज पाठवला. दुसरी पीडित मुलगी कोचपेक्षा वयाने खूप लहान होती. आपल्या कामासंदर्भात ती कोचला भेटायची. तिला सुद्धा अश्लील फोटो पाठवलेले. त्यावर त्याने काही उत्तर दिलं नाही. त्यानंतर पीडित मुलीला चेंजिंग रुममध्ये कचरा शोधायला सांगितला, तिथे कोचने तिच चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कारवाई करण्यात आली.