Sourav Ganguly : सौरभ गांगुलीच्या कारचा अपघात, थोडक्यात वाचला माजी क्रिकेटर

Sourav Ganguly Car Accident: भारताचा माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुलीच्या कारचा गुरूवारी अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या लॉरीमुळे हा अपघात झाल्याचे समजते.सुदैवाने सौरभ गांगुली या अपघातातून थोडक्यात बचावला आहे.

Sourav Ganguly : सौरभ गांगुलीच्या कारचा अपघात, थोडक्यात वाचला माजी क्रिकेटर
सौरव गांगुली
Image Credit source: file photo
| Updated on: Feb 21, 2025 | 7:53 AM

भारताची माजी क्रिकेटपटू, दिग्गज खेळाडू सौरभ गांगुलीच्या कारचा काल ( गुरूवारी) अपघात झाला. सुदैवाने सौरभ गांगुली या अपघातातून थोडक्यात वाचला असून त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. दुर्गापूर द्रुतगती मार्गावर त्याच्या कारला अपघात झाला. तो वर्धमान येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होता. सौरभ गांगुलीची कार दुर्गापूर एक्स्प्रेस वेवरून जात असताना हा अपघात झाला. यावेळी सिंगूरजवळ अचानक भरधाव वेगात आलेल्या लॉरीने त्याच्या कारला धडक दिली.

तेव्हा सौरभ गांगुलीच्या कारच्या चालकाने गाडीवर ताबा मिळवण्यासाठीतातडीने ब्रेक लावला. त्यानंतर त्याच्या मागे येणारी, ताफ्यातील सर्व वाहने सौरभ गांगुलीच्या कारला एकामागून एक धडकली आणि मोठा अपघात झाला. मात्र, या भीषण अपघातातून गांगुली थोडक्यात बचावला. ताफ्यातील वाहनांचे मात्र बरेच नुकसान झाले. थोडा वेळ रस्त्यावर वाट पाहिल्यानंतर सौरभ गांगुली त्याच्या कार्यक्रमासाठी निघून गेला.

थोडक्यात वाचला सौरभ गांगुली

माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या कारला गुरुवारी संध्याकाळी वर्धमानला जात असताना अपघात झाला. हा अपघात दुर्गापूर एक्स्प्रेस वेच्या दंतनपूर भागात घडला, जिथे त्याच्या रेंज रोव्हर कारला एका लॉरीने धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, पावसात गांगुलीचा ताफा पुढे जात होता. तेव्हा अचानक एका लॉरीने त्यांच्या कारला धडक दिली. ही परिस्थिती हाताळण्यासाठी आणि नुकसान टाळण्यासाठी सौरभ गांगुलीच्या ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावला, ज्यामुळे मागून येणारी वाहनं एकमेकांवर आदळली. आणि अपघात झाला.

वर्धमान युनिलव्हर्सिटीत जात होता सौरभ गांगुली

या अपघातात सौरव गांगुलीच्या कारला ट्रॉलीची पुढून तर अनेक कारची पाठीमागून धडक बसली, मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, हीच एक दिलासदायक बाब आहे. मात्र, एकमेकांवर आदळल्याने या ताफ्यातील वाहनांचे झाले आहे. अपघातानंतर सौरभ गांगुली सुमारे 10 मिनिटे रस्त्यावरच होता. मात्र, त्यानंतर तो वर्धमान विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पुढे निघाला. या अपघातात गांगुली थोडक्यात बचावला असून मोठा अनर्थ टळला आहे.