Shikhar Dhawan : जब प्यार किया तो डरना क्या !शिखर धवनकडून प्रेमाची जाहीर कबुली

आयपीएल 2025 मधून बाहेर पडलेला शिखर धवन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो सगळीकडे एका मुलीसोबत दिसतोय, त्याचा अंदाजही वेगळा होता. याबाबात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Shikhar Dhawan : जब प्यार किया तो डरना क्या !शिखर धवनकडून प्रेमाची जाहीर कबुली
शिखर धवन
Image Credit source: social media
| Updated on: May 01, 2025 | 7:46 PM

शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली असेल, पण प्रेमाच्या मैदानावर त्याची नवी इनिंग सुरू झाली आहे. शिखर धवनला एक नवीन गर्लफ्रेंड मिळाली आहे, जिच्याबद्दल त्याने संपूर्ण जगाला जाहीरपणे सांगितले आहे. ही मुलगी म्हणजे सोफी शाइन, जी बऱ्याच काळापासून शिखर धवनसोबत दिसत होती. शिखर धवनने गुरुवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट पोस्ट करत ज्यामध्ये त्याने स्वतःचा आणि सोफीचा एक फोटो शेअर केला. या फोटोवर लिहिलेली कॅप्शनही खूप खास होते. कॅप्शनमध्ये लिहिले होते, माय लव्ह .

 

आयर्लंडच्या तरूणीच्या प्रेमात धवन बोल्ड

टीम इंडियाचा माजी सलामीवीर असलेला शिखर धवन सध्या आयर्लंडची रहिवासी असलेल्या सोफी शाइनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक फोटो पोस्ट करून हे जाहीर केलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान शिखर धवन सोफीसोबत दिसला होता. शिखर धवन केवळ सामना पाहण्यासाठी आला नव्हता, तर तो एका लग्नालाही उपस्थित राहिला. या काळात दोघेही बऱ्याजचा एकत्र दिसले. सोशल मीडियावर दोघांचीही चर्चा सुरू झाली.एका फोटोत शिखर धवन सोफीच्या कमरेभोवती हात ठेवून दिसला होता. एवढंच नव्हे तर त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता . दोघंही एकमेकांच्या प्रेमात असल्याचा अंदाज अनेकांनी त्यानंतर लावला होता.

2024 नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा दिसले एकत्र

याआधी, शिखर धवन आणि सोफी गेल्या वर्षी दिसले होते. नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधीही, दोघे विमानतळावर एकत्र दिसले होते, ज्यामुळे त्यांच्या नात्याच्या चर्चांना, अफवांना आणखी बळकटी मिळाली. इतके दिवस यावरकाहीहन बोलणाऱ्या शिखर धवनने आता जाहीररित्या त्याचं प्रेम कबूल केलं आहे. त्याची गर्लफ्रेंड, सोफी ही मूळची आयर्लंडची रहिवासी आहे. शिखर धवन आणि सोफी हे दोघे एकमेकांना सोशल मीडियावरही फॉलो करतात.
शिखर धवनने त्याचे प्रेम व्यक्त केले आहे. सोफीचे 44 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान सोफी भारत आणि पाकिस्तानमधील सामना पाहण्यासाठी देखील आली होती.