Vinod Kambli health update: विनोद कांबळी यांची प्रकृती बिघडली? व्हिडीओ पाहून चाहते हैराण, पुन्हा का आली अशी वेळ?
Vinod Kambli viral video: विनोद कांबळी यांनी सोशल मीडियावर वृद्धाश्रमातील व्हिडीओ शेअर केल्याने खळबळ माजली आहे. नेटकऱ्यांनी व्हिडीओ पाहून चिंता व्यक्त केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इंटरनेटवर त्यांचा एक नवीन व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण चकीत झाले आहेत. तर काहींनी चिंता वक्त केली आहे. या व्हिडीओमध्ये ते वृद्धांची देखभाल करणाऱ्या एका अल्डरली केअर सेंटरमध्ये दिसत आहेत. या दिग्गज खेळाडूला या अवस्थेत पाहून लोक त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. मात्र व्हायरल व्हिडीओमध्ये विनोद कांबळी स्वतः त्या आश्रमाच्या सुविधा आणि तिथल्या चांगल्या वातावरणाची प्रशंसा करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी स्वतः वृद्धाश्रमाबाबत बोलताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये विनोद कांबळी म्हणाले, “मी सध्या निदानमध्ये आहे. मी सांगू इच्छितो की इथल्या सुविधा खूप चांगल्या आहेत.” पुढे त्यांनी तिथल्या व्यवस्थांची प्रशंसा करत म्हटले की, “इथे स्वच्छता आणि इतर सर्व गोष्टी एकदम फर्स्ट क्लास आहेत. मला इथे राहताना कधीही असे वाटत नाही की मी घरी नाही. इथल्या लोकांकडून मला खूप जास्त प्रेम आणि आदर मिळत आहे.”
Vinod Kambli’s latest video, he is presently at an elderly care centre in Thane.
Praying for his recovery soon. pic.twitter.com/6k1plg1aCl
— Abhishek ✨ (@ImAbhishek7_) September 25, 2026
नेटकऱ्यांनी व्यक्त केली चिंता
कांबळींचा हा व्हिडिओ समोर येताच इंटरनेटवर क्रिकेट फॅन्सची चिंता खूप वाढली आहे. अनेक लोक त्यांची अशी अवस्था पाहून दुःख व्यक्त करत आहेत, तर काही लोक त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. एका यूजरने कमेंट करत, “कांबळीजी यांनी बरे होऊन कॉमेंट्री करावी. आजकाल कॉमेंट्री करणारेही करोडो रुपये कमावतात. त्यांनी आयपीएलची कॉमेंट्री चांगल्या प्रकारे सांभाळावी” असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने, “विनोद कांबळी यांची प्रकृती पुन्हा खालावली का? त्यांना का नेलंय वृद्धाश्रमात” अशी कमेंट केली आहे.
भारतासाठी १७ कसोटी सामने खेळले आहेत विनोद कांबळी
विनोद कांबळी यांनी भारतासाठी १७ कसोटी सामने खेळले. त्यामध्ये त्यांनी सरासरीने १,०८४ धावा केल्या आणि ४ शतके झळकावली. ते भारताकडून सर्वात वेगाने १००० कसोटी धावा करणारे फलंदाजही आहेत. अलीकडेच यशस्वी जयस्वाल यांनी हा रेकॉर्ड मोडण्याच्या जवळ पोहोचले होते, पण त्यांनी १६ डावांमध्ये हे यश मिळवले आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिले. वनडे सामन्यांचा विचार केला तर कांबळी यांनी १०४ सामने खेळले आणि सुमारे ३२ च्या सरासरीने २४७७ धावा केल्या. त्यामध्ये २ शतके आणि १४ अर्धशतके समाविष्ट आहेत.