
Yuvraj Singh: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण युवराज याचं बालपण फार कठीण होतं. सांगायचं झालं तर, युवराज याने क्रिकेट विश्वात स्वतःला सिद्ध करुन दाखवलं, ते फक्त आणि फक्त वडील योगराज सिंह यांच्यामुळे… कारण वडिलांनी युवराज याला क्रिकेट शिवाय दुसरा कोणता खेळ खेळूच दिला नाही. युवराज याचे वडील फार कठोर होते. पण युवीला वडिलांसोबत फार काळ राहता आलं नाही. नुकताच सानिया मिर्झा हिच्यासोबत बोलताना युवराज याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. विशेषतः त्याने आईच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे.
युवराज सिंह म्हणाला, ‘मी माझ्या आईला खूप त्रास सहन करताना पाहिलं आहे. या विषयी मी फार काही बोलणार नाही, की नक्की काय झालं होतं आणि का झालं होतं… माझी आई तिच्या आई – वडिलांसोबत राहत होती. ज्या दिवशी मला पहिला चेक मिळाला, तो क्षण माझ्यासाठी फार खास होची… मला असं वाटलं, मी त्या महिलासाठी काहीतरी करु शकलो, जिने माझी इतके वर्ष रक्षा केली आहे. आईला काहीतरी देण्याची वेळ आली, तेव्हा मी तिला तिच्या हक्काचं घर दिलं.’
वडील होण्याबद्दल बोलताना युवराजने त्याचे संपूर्ण श्रेय पत्नी, अभिनेत्री हेजल कीचला दिलं. ‘माझ्या मुलांसोबत माझं नातं फार चांगलं आहे आणि याचं श्रेय मी पुर्णपणे हेजल याला देत आहे… मुलांचा जन्म झाल्यानंतर मी त्यांचे डायपर बदलायला आणि दूध पाजायला खूप घाबरायचो. पण तेव्हा मला हेजलने समजावलं, असं केल्यामुळे तुझं मुलांसोबत नातं आणखी घट्ट होईल. आज परिस्थिती अशी आहे की, मी एक महिना तरी मुलांना भेटलो नाही तर, आम्ही रोज बोलत असतो. दूर असलो तर, मला त्यांची खूप आठवण येते आणि त्यांना माझी… ‘
स्वतःचं लहानपण आठवत युवी म्हणाला, ‘कधीकधी असं वाटतं की काही क्षणी आपले आई – वडील आपल्यासोबत नव्हते. मला कायम असं वाटायचं की, मी माझ्या आई – वडिलांसोबत थीम पार्कमध्ये जाऊ शकलो असतो तर… सहलीला जाऊ शकलो असतो तर…. तेव्हा काही कळत नव्हतं… पण आता कळत आहे… असं देखील युवराज म्हणाला.
युवराज सिंह याची आई शबनम यांना घटस्फोट दिल्यानंतर, योगराज यांनी 90 च्या दशकातील पंजाबी अभिनेत्री नीना बुंदेल यांच्यासोबत लग्न केलं. नीना बुंदेल आणि योगराज यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे… त्यांच्या मुलगा विक्टर अभिनय विश्वात सक्रिय आहे, तर मुलगी अमरजीत कौर रॅकेट प्लेयर आहे… पूर्वी ती टेनीस खेळायची… तिचं निकनेम एमी असं आहे…