
पाकिस्तानचा माजी कर्णधार तथा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने (Wasim Akram) जगातील अनेक फलंदाजांना त्याच्या बॉलवर तंबूत पाठवलं, भल्याभल्या फलंदाजांच्या आपल्या बोलिंगने विकेट्स काढल्या पण वसीम अक्रम एका बॉलिवूड अभिनेत्रीसमोर क्लिन बोल्ड झाला होता....!

क्रिकेटपटू वसीम अक्रम मिस युनिव्हर्स सुश्मिता सेनच्या (Sushmita Sen) प्रेमात वेडा झाला होता. 2008 साली 'एक खिलाडी एक हसीना'च्या सेववर दोघांची पहिली भेट झाली. या शो चे वसीम आणि सुश्मिता दोघेही परीक्षक होते.

ज्यावेळी वसीम अक्रम सुश्मिताच्या प्रेमात पडला, त्यावेळी त्याचं लग्न झालं होतं. मात्र तरीही त्याला सुश्मिता खूप आवडायची... दोघेही अनेक वेळा एकमेकांच्या हातात हात घालून फिरायचे. तसे फोटो व्हायरल व्हायचे.

वसीम अक्रम खूप दिवस सुश्मिता सेनला डेट करायचा. पण दोघांनीही आपलं नातं खुलेपणाने कधीच जगाला सांगितलं नाही. नेहमी त्यांनी दोघांमधल्या नात्याचा इन्कार केला. सुश्मिताला जेव्हा जेव्हा या नात्याबद्दल विचारलं गेलं तेव्हा ती खूप भडकायची. तर अक्रमला विचारल्यावर त्या केवल अफवा एवढंच उत्तर अक्रम द्यायचा.

पुढे कालांतराने सुश्मिता आणि वसीम यांच्या नात्याच्या चर्चा थांबल्या, वसीमची पहिली बायको हुमाचं निधन झाल्यावर वसीमने ऑस्ट्रेलियाच्या शनायरा थॉमसनसोबत लग्नगाठ बांधली.