राहुल द्रविडच्या नेतृत्त्वात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूची आत्महत्या

| Updated on: Oct 10, 2020 | 11:52 AM

'द वॉल' राहुल द्रविडच्या नेतृत्वात जबरदस्त कामगिरी करणारा क्रिकेटपटू उंबरी उर्फ एम. सुरेश कुमारने आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

राहुल द्रविडच्या नेतृत्त्वात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूची आत्महत्या
Follow us on

नवी दिल्ली: ‘द वॉल’ राहुल द्रविडच्या नेतृत्वात जबरदस्त कामगिरी करणारा क्रिकेटपटू उंबरी उर्फ एम. सुरेश कुमारने (M. Suresh Kumar) आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. सुरेश कुमारने 1990मध्ये अंडर-19च्या टीममधून केरळचं प्रतिनिधीत्व केलं होतं. केरळमधून अंडर-19च्या टीममध्ये (Indian under19 cricket team) खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला होता.

सुरेश कुमारने आज सकाळी राहत्या घरी आत्महत्या केली. त्याचा मृतदेह घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे पोलिसांना तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनीही पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत.

स्पिनर सुरेश कुमारने 1990मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केलं होतं. त्यावेळी राहुल द्रविड अंडर-19च्या संघाचा कर्णधार होता. त्यावेळी सुरेश कुमार आताचे आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्जचे कोच आणि न्यूझीलंड संघाचे माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंग आणि जलदगती गोलंदाज डियोन नॅशच्या विरोधात मैदानात उतरला होता. केरळने 1994-94मध्ये रणजी करंडक जिंकला होता. तामिळनाडू विरुद्ध झालेल्या या सामन्यातील विजयात सुरेश कुमारचा सिंहाचा वाटा होता. रणजी करंडकमध्ये सुरेशने 164 धावा देऊन 12 बळी घेतले होते. त्यानंतर 1995-96मध्येही रणजी करंडकमध्ये राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने हॅट्रिक केली होती.

2005मध्ये क्रिकेट संन्यास

सुरेशने झारखंडविरुद्धचा रणजी सामना खेळल्यानंतर 2005मध्ये क्रिकेट संन्यास घेतला होता. त्यानंतर तो रेल्वेसोबत काम करू लागला. सुरेशने त्याच्या करिअरमध्ये 72 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 196 बळी घेतले होते. या काळात त्याने 51 लिस्ट ए सामन्यातही भाग घेतला होता. त्याच्या कारकिर्दीत त्याने अनेक बड्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. (Indian under19 cricket team)

संबंधित बातम्या:

आयपीएलमध्ये सिलेक्शन न झाल्याने नाराज, मुंबईत युवा क्रिकेटपटूचा गळफास

विरारच्या ऑलराऊंडर क्रिकेटपटूची आईसह आत्महत्या

(Indian under19 cricket team)