Camila Giorgi French open 2022: फ्रेंच ओपनमध्ये अंपायरला महिला टेनिसपटूला सांगावं लागलं, ‘ड्रेस बदलून या’
सध्या फ्रेंच ओपन स्पर्धा (French open tournament) सुरु आहे. इथे अनेक रंगतदार सामने सुरु आहेत. पण या स्पर्धेदरम्यान एका महिला खेळाडूच्या कपड्यावरुन वाद निर्माण झाला आहे.

मुंबई: सध्या फ्रेंच ओपन स्पर्धा (French open tournament) सुरु आहे. इथे अनेक रंगतदार सामने सुरु आहेत. पण या स्पर्धेदरम्यान एका महिला खेळाडूच्या कपड्यावरुन वाद निर्माण झाला आहे. संबंधित महिला खेळाडू सामना खेळण्यासाठी कोर्टवर पोहोचली, तेव्हा अंपायरने तिने घातलेल्या ड्रेसवर आक्षेप घेतला व ड्रेस बदलून यायला सांगितलं. कॅमिला गिओर्गी (camila giorgi) असं या महिला टेनिसपटूच नाव आहे. कॅमिला गिओर्गी इटलीची प्रसिद्ध टेनिसपटू (Tennis player) आहे. फ्रेंच ओपनमध्ये ती तिसऱ्या राऊंडचा सामना खेळण्यासाठी पोहोचली होती. त्यावेळी अंपायरने तिच्या ड्रेसवर आक्षेप घेतला. सामना सुरु करण्याआधी अंपायरने कॅमिला गिओर्गीला जवळ बोलावल व तिला ड्रेस बदलून यायला सांगितलं. आपण कोर्टवर येताना सोबत दुसरा ड्रेस आणलेला नाही. त्यामुळे दुसरा ऑप्शन नाहीय, असं कॅमिला गिओर्गीने अंपायरला सांगितलं.
वादाचं कारण काय?
कॅमिला गिओर्गीच्या ड्रेसवरील स्पॉन्सर्ड जाहीरातीवरुन हा वाद झाला. अंपायरचा त्यावर आक्षेप होता. अंपायरच्या मते, जाहीरातीची साइज खूप मोठी होती आणि हे नियमाच्या विरोधात आहे.
दुसरा ड्रेस नसल्याचं अंपायरला सांगितलं
आपल्याकडे रिप्लेसमेंट नाहीय, असं कॅमिला गिओर्गीने अंपायरला सांगितलं, तेव्हा अंपायरने तिला त्याच ड्रेसमध्ये खेळू दिलं. पण नंतर मात्र कारवाई केली. विशेष म्हणजे कॅमिला गिओर्गीने हा सामना 4-6, 6-1, 6-0 ने जिंकला. कॅमिला गिओर्गीचे इन्स्टाग्रामवर 6 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर ती सतत स्वत:चे हॉट फोटो पोस्ट करत असते. मागच्यावर्षी विम्बल्डन चॅम्पिनशिप आधी सुद्धा कॅमिला गिओर्गीने तिचे काही फोटो पोस्ट केले होते.
