AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: भारतीय संघात फूट, श्रेयससमोर उभा असतानाही गंभीरने आवडत्या खेळाडूला कर्णधार बनवला; मॅचमधील Video Viral

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात असे चित्र पाहायला मिळाले की ते पाहून असे वाटेल की टीम इंडियाचे ड्रेसिंग रुममधील वातावरण चांगले नाही, व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.

IND vs ENG: भारतीय संघात फूट, श्रेयससमोर उभा असतानाही गंभीरने आवडत्या खेळाडूला कर्णधार बनवला; मॅचमधील Video Viral
shreyas iyer and gautam gambhir
| Updated on: Jul 05, 2026 | 11:18 AM
Share
 भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रंगला. भारतीय संघाची इंग्लंडविरुद्ध मालिकेतही सुरुवात वाईटच झाली, भारतीय संघाने दुसरा सामना गमावला. इंग्लंडने दुसरा सामना 4 विकेट्सने जिंकला. इंग्लंडने तर हा सामना 19 व्या षटकांतच जिंकला. या सामन्यात एका गोष्टीची जास्त चर्चा झाली ती म्हणजे बहुप्रतिक्षित डेब्यू. अखेर कालच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पण मिळाले आणि सर्व क्रिकेटप्रेमींना आनंद झाला. पण वैभवला संघात घेऊनही भारतीय संघाला काही विशेष निकाल मिळालेला नाही. वैभव सूर्यवंशीच्या डेब्यूनंतरही भारतीय संघाला सामना जिंकता आला नाही. कर्णधार श्रेयस अय्यरने संघाची धुरा हाती घेतल्यापासून त्याला काही विशेष यश मिळत नाही. यातच आता काल सामना दरम्यान एक चित्र पाहायला मिळाले.

भारत आणि इंग्लंड दुसऱ्या सामन्यात गौतम गंभीर ड्रिंक्स ब्रेकमध्ये टीम इंडियाला मार्गदर्शन करण्यासाठी मैदानात आला. यावेळी गंभीरने श्रेयस अय्यरकडे दुर्लक्ष केलं. तर इशान किशनला सल्ले देताना दिसला. गंभीरचे ऐकण्यासाठी अय्यर जेव्हा जवळ गेला, त्यावेळी देखील गंभीरने त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि तो इशानशी बोलत राहिला, त्यामुळे गंभीर आणि श्रेयस यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याचं बोललं जात आहे. त्याचा परिणाम भारतीय संघाच्या खेळावर होत आहे. भारतीय संघाच्या पराभवामागे संघातील वातावरण कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.

खराब फॉर्ममुळे सूर्यकुमार यादवला कर्णधार पदावरुन काढून टाकण्यात आले नाही तर त्याला संघातून पण वगळण्यात आले. सूर्याचा फॉर्म जरी खराब असला तरीही त्यांच्या कर्णधारपदात भारतीय संघाला विशेष यश मिळाले आहे. टी- 20 मालिका भारतीय संघ जिंकायची. याउलट श्रेयस अय्यर कर्णधार झाल्यापासून आयर्लंडविरुद्धची मालिकाही जिंकू शकला नाही. संघात इतके तगडे खेळाडू असूनही असे का होत आहे आता यावर विचार करण्याची गरज आहे.  जेव्हा सूर्या कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळायचा तेव्हा सूर्या आणि गंभीरमध्ये समन्वय चांगले होते त्याचा परिणाम भारतीय ड्रेसिंग रुममध्ये होत होता. कोच आणि कर्णधारामध्ये वाद नसला की खेळाडूंमध्येही आनंदाचे वातावरण असते.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...