AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: ‘त्याला शिकण्याची फार गरज आहे’ पराभवाचे खापर श्रेयसने एकट्यावर फोडले; थेट नावाचा उल्लेख करत झापलं

भारत आणि इंग्लंडमध्ये रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने बाजी मारली आणि सामना जिंकला. आता या सामन्यातील पराभवामागे कर्णधार श्रेयस अय्यरने एकट्याला जबाबदार ठरवलं आहे.

IND vs ENG: 'त्याला शिकण्याची फार गरज आहे' पराभवाचे खापर श्रेयसने एकट्यावर फोडले; थेट नावाचा उल्लेख करत झापलं
shreyas iyer
| Updated on: Jul 05, 2026 | 8:54 AM
Share

टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी दिली. सूर्यवंशीच्या पदार्पणाच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि 190 धावा केल्या. पण वैभवचे पदार्पणही भारतीय संघाला वाचवू शकले नाही. त्यानंतर, जेव्हा इंग्लंडला 24 चेंडूंमध्ये 49 धावांची गरज होती, तेव्हा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने निर्णायक क्षणी सहा चेंडूंमध्ये 29 धावा दिल्या. यामुळे सामना इंग्लंडच्या हाती लागला. आता भारतीय संघाला मालिका जिंकायची असेल तर पुढील तीनही सामने जिंकावे लागतील. या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचा संताप अनावर झाला आणि पराभवामागे कोण जबाबदार हे बोलून दाखवले.

190 धावांचे लक्ष्य गाठताना इंग्लंडला विजयापासून थोडे दूर राहावे लागत होते. त्यानंतर, डावाच्या 17 व्या षटकात श्रेयस अय्यरने फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईकडे चेंडू सोपवला. इंग्लंडला विजयासाठी 24 चेंडूंमध्ये 49 धावांची गरज होती. बिश्नोईने पहिल्याच चेंडूवर नो-बॉल टाकला, ज्यावर दोन धावा मिळाल्या. त्यानंतर, जेकब बेथेलने आपल्या पहिल्याच वैध चेंडूवर षटकार मारला. यानंतर बिश्नोई पुनरागमन करू शकला नाही आणि त्याने आणखी एक नो-बॉल टाकला. आपल्या स्पेलच्या तिसऱ्याच चेंडूवर नो-बॉल टाकल्यानंतर त्याचा आत्मविश्वास कमी झाल्याचे दिसले. बेथेलने याचा पुरेपूर फायदा घेतला आणि आणखी दोन षटकार व एक चौकार मारून या षटकात एकूण 29 धावा जमवल्या.

येथून पुढे टीम इंडिया सामन्यात मागे पडली. सामन्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, “आपण 17 व्या षटकात सामना गमावला हे सर्वांना माहीत आहे. तो पुनरागमन करेल, पण त्याला शिकण्याची गरज आहे. या खेळपट्टीवर ही धावसंख्या योग्य होती. बिश्नोईने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये महागड्या धावा दिल्या.”

श्रेयस अय्यरची नाराजी रास्त होती, कारण तो कर्णधार झाल्यापासून टीम इंडियाने एकही सामना जिंकलेला नाही. अय्यरच्या कर्णधारपदाखाली, आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. यानंतर, इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसरा सामना भारताने गमावला. आता, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच, एका भारतीय कर्णधाराला आपल्या पहिल्या चार सामन्यांमध्ये एकही सामना जिंकता आलेला नाही. आतापर्यंत 12 खेळाडूंनी भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व केले असून, हा नकोसा विक्रम अय्यरच्या नावावर झाला आहे.

श्रेयस अय्यरची नाराजी रास्त होती, कारण तो कर्णधार झाल्यापासून टीम इंडियाने एकही सामना जिंकलेला नाही. श्रेयसच्या कर्णधारपदाखाली, आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसरा सामना भारतीने गमावला. आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यादांच, एका भारतीय कर्णधाराला आपल्या पहिल्या चार सामन्यांमध्ये एकही सामना जिंकता आलेला नाही. आतापर्यंत 12 खेळाडूंनी भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व केले असून, हा नकोसा विक्रम श्रेयसच्या नावावर झाला आहे.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...