AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पद्मविभूषण पुस्कार विजेत्या, प्रसिद्ध गायिकेचं निधन; संगीत क्षेत्रात शोककळा

teejan bai death : प्रसिद्ध पांडवाणी गायिका तीजन बाई यांचं निधन झालं, त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

पद्मविभूषण पुस्कार विजेत्या, प्रसिद्ध गायिकेचं निधन; संगीत क्षेत्रात शोककळा
| Updated on: Jul 05, 2026 | 8:51 AM
Share

भारतीय संगीत क्षेत्रातून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायिका, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या तीजन बाई यांचं निधन झालं. रायपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) रुग्णालयात त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीजन बाई या मागील काही आठवड्यांपासून रायपूरच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. मात्र, आज पहाटे 3.15 वाजता त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनांतर छत्तीसगडसहित संपूर्ण देशातील सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

https://x.com/OPChoudhary_Ind/status/2073600830146830562

तीजन बाई प्रेक्षकांना करायच्या मंत्रमुग्ध 

छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात गनियारी गावात 1956 साली तीजन बाई यांचा जन्म झाला. त्यांच्या आयुष्याचा प्रवास फार संघर्षमय होता. त्यांनी ‘पांडवाणी’ या लोककलेला जतन करत नवा आयाम दिला. तीजन बाई यांनी पांडवाणीची ‘कापालिका शैली’ स्वीकारली होती. परंपरेला छेद नव्या क्षेत्रात उतरलेल्या तीजन बाई यांना सुरुवातीला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यांनी दमदार आवाज, अभिनय कौशल्य आणि हातातील तानपुऱ्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायच्या.

सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार प्राप्त  गायिका 

5 दशकांहून अधिक काळ कलेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहिल्या. छत्तीसगडमधील ही कला त्यांनी केवळ देशभरात नव्हे, तर आशिया, युरोपसह जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. सुरुवातीच्या काळात होणार्‍या विरोधाला न जुमानल्या नाहीत. त्यांनी खऱ्या अर्थाने पांडवाणीचे जतन केलं. तसेच या पांडवाणीला लोकप्रिय केलं. त्यांनी कलाकारांच्या अनेक पिढ्यांच्या मार्गदर्शक ठरल्या. भारताच्या छत्तीसगडमधील पांडवाणी कलेला जगात एक वेगळी ओळख करून दिली. लोकसंस्कृती, कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल तीजनबाईंचा सरकारनेही गौरव केला. त्यांना पद्मश्री (1987/88), पद्मभूषण (2003), पद्मविभूषण (2019), संगीत नाटक अकादमी पुरस्कार यांसह देशाचे सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या निधनाने सर्वत क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहू लागले आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ