AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गायत्री मंत्र अन् कलमा एकातच.. सोनाक्षीच्या घरातील पेंटिंग पाहून नेटकरी अवाक्!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. या दोघांनी आंतरधर्मीय लग्न केलं असून सोनाक्षी आणि झहीर एकमेकांच्या धर्माचा खूप आदर करतात. आता सोनाक्षीने तिच्या घरातील एक खास पेंटिंग दाखवली आहे, ज्यामध्ये गायत्री मंत्र आणि कलमा या दोघांची झलक पहायला मिळतेय.

गायत्री मंत्र अन् कलमा एकातच.. सोनाक्षीच्या घरातील पेंटिंग पाहून नेटकरी अवाक्!
Sonakshi Sinha and Zaheer Iqbal Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 05, 2026 | 8:42 AM
Share

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या आंतरधर्मीय लग्नावरून अनेकांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे दोघं एकमेकांच्या धर्माचा नेहमीच आदर करताना दिसतात. आता सोनाक्षीने झहीरसोबतच्या लग्नाच्या दिवसातील एका खास क्षणाची आठवण चाहत्यांना सांगितली आहे. यासोबतच तिने तिला मिळालेल्या अत्यंत खास भेटवस्तूचाही फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर तिने तिच्या घरातील पेंटिंगचे हे फोटो पोस्ट केले असून त्यात गायत्री मंत्र आणि कलमा हे दोन्ही एकत्र लिहिल्याचं तिने सांगितलं आहे. सोनाक्षीच्या लग्नातील खास क्षणसुद्धा असाच काहीसा होता. ज्यावेळी पंडित गायत्री मंत्रचा जप करत होते, त्याचवेळी अझानचाही आवाज तिच्या घरात घूमत होता.

हे फोटो शेअर करत सोनाक्षीने लिहिलं, ‘जेव्हा आमचं लग्न पार पडत होतं आणि पंडित गायत्री मंत्रचा जप करत होते, तेव्हा अझानचाही आवाज आमच्या घरापर्यंत पोहोचत होता. त्या दोन्ही प्रार्थनांच्या शक्तीने आमच्या घराला आज इतकं आनंदी बनवलं आहे. एके दिवशी जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होतो, तेव्हा शुभिका शर्माचा अचानक फोन आला. ती म्हणाली की तिला आमच्या लग्नासाठी आम्हाला एक पेंटिंग भेट द्यायची आहे. पण जेव्हा तिने आम्हाला काय द्यायचं आहे हे समजावून सांगितलं, तेव्हा असं वाटलं की जणू काही तिला ही कल्पना आमच्या मनातूनच सुचली आहे. त्या पेंटिंगमध्ये आमच्या दोघांचीही श्रद्धा आणि प्रेम यांचं सकारात्मकतेच्या सुसंवादात कसं रुपांतर झालं आहे, याचं प्रतिबिंब असल्याचं ती म्हणाली.’

सोनाक्षीने शेअर केलेला फोटो-

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

या पोस्टमध्ये सोनाक्षीने पुढे म्हटलंय, ‘मग तिने माझी ओळख कलाकाराशी करून दिली. अत्यंत प्रतिभावान कलाकार आदिला बेदी आमच्या घरी आला. त्याने आमचे विचार आणि भावना समजून घेतल्या आणि त्या कॅनव्हासवर सुंदरपणे उतरवल्या. तुम्ही याला एक दैवी चमत्कारच म्हणू शकता, कारण जेव्हा आम्ही लॉस एंजेलिसमध्ये होतो, तेव्हा त्याने माझ्याशी संपर्क साधला. आम्ही तिथे आहोत हे त्याला माहितही नव्हतं आणि त्याने मला सांगितलं की पेंटिंग तयार आहे. गायत्री मंत्र आणि कलमा यांचा संगम असलेली ही सुंदर कलाकृती माझ्यासोबत परत आली आहे. या पेंटिंगने आमच्या घरात आपलं स्थान मिळवलं आहे. मला खात्री आहे की यामुळे आम्हाला आणखी प्रेम, आनंद आणि शांती मिळेल. हे घर आता अधिक परिपूर्ण आणि पवित्र वाटत आहे.’

सोनाक्षी ही हिंदू कुटुंबातील असून झहीर हा मुस्लीम पार्श्वभूमीचा आहे. या दोघांनी 23 जून 2024 रोजी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केलं. सोनाक्षीने शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये गायत्री मंत्र तर स्पष्ट दिसत आहे, पण कलमा कुठे लिहिला आहे, असा सवाल काहींनी केला आहे.

Follow Us
पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा टोला
Sanjay Raut | जयंत पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा खोचक टोला
राणांच्या दाव्यावर तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते..
Sunil Tatkare | रवी राणांच्या दाव्यावर सुनील तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते...
महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद
Mahesh Tutorials | महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद; 2,500 विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी
नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला
Nagpur | नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला, पुढील तपास सुरू
एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज...
Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज होणार खलबतं; काय घडतंय?
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र....
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, सुप्रिया सुळे दिल्लीत तर सुनेत्रा पवार... त्या बड्या नेत्याने केला मोठा दावा
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक...

मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक..

सिया बाहेर आली आणि त्याच रुममध्ये दुसऱ्या मैत्रिणीसोबत चेतन, हादरवणारे हॉटेल कांड, केतन अग्रवाल प्रकरणात...

सिया बाहेर आली आणि त्याच रुममध्ये दुसऱ्या मैत्रिणीसोबत चेतन, हादरवणारे हॉटेल कांड, केतन अग्रवाल प्रकरणात..

‘पेंद्या भाई’ दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर आला बाहेर, मध्यरात्री अघटित घडलं अन्….

‘पेंद्या भाई’ दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर आला बाहेर, मध्यरात्री अघटित घडलं अन्…

गुजरातहून कल्याणला आलेल्या महिलेसोबत स्टेशनवर धक्कादायक घटना, मध्यरात्री उठल्यानंतर झालं होत्याचं नव्हतं.

गुजरातहून कल्याणला आलेल्या महिलेसोबत स्टेशनवर धक्कादायक घटना, मध्यरात्री उठल्यानंतर झालं होत्याचं नव्हतं

तुम्हालाही डॉक्टर व्हायचंय? नीटमध्ये देशात टॉप ठरलेल्या पंशुलने सांगितलं यशाचं टॉप सीक्रेट; असा करा अभ्यास.

तुम्हालाही डॉक्टर व्हायचंय? नीटमध्ये देशात टॉप ठरलेल्या पंशुलने सांगितलं यशाचं टॉप सीक्रेट; असा करा अभ्यास

आदिनाथ कोठारे-उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट; दोघांकडे किती संपत्ती? कोण श्रीमंत?.

आदिनाथ कोठारे-उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट; दोघांकडे किती संपत्ती? कोण श्रीमंत?