
भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटर इरफान पठाण आज 35 वा वाढदिवस साजरा करतोय. भारताच्या या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा संस्मरणीय कामगिरी केली आहे. 2006 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असताना इरफानच्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते.

इरफानने 2006 मध्ये पाकिस्तानमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात हॅट्ट्रिक केली होती. त्या सामन्यात इरफाने तब्बल 6 बळी घेतले होते. या सामन्यात इरफान गोलंदाजीसाठी आल्यावर त्याच्या पहिल्या तीन चेंडूंवर पाकिस्तानी फलंदाजांनी एकही धाव घेतली नाही. चौथ्या चेंडूवर त्याने सलमान भट्टला झेलबाद केले. राहुल द्रविडने भट्टचा झेल टिपला. त्यानंतर आलेल्या युनुसला खान पायचित (एलबीडब्ल्यू) केले. त्यानंतर आलेल्या मोहम्मद युसूफला इरफानने बोल्ड केले.

टी-20 वर्ड्लकप फायनल : पाकिस्तानविरुद्ध 3/16 (जोहान्सबर्ग) : 2007 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इरफान पठाणने 16 धावा देत 3 बळी घेतले होते. यात त्याने शाहीद आफ्रिदी आणि यासिर अराफतला बाद केले होते. या सामन्यात त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारना सन्मानित करण्यात आले.

श्रीलंकेविरुद्ध 5/61 पल्लेकेले ODI : पल्लेकेले इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 294 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी लंकेच्या संघाला 274 धावांमध्ये गुंडाळले. यावेळी इरफान पठाणने 61 धावा देत पाच फंदाजांना बाद केले होते.

Irfan

श्रीलंकेविरुद्ध 83 धावा (नागपूर वनडे) : नागपूर वनडेमध्ये इरफान पठाणने श्रीलंकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. यावेळी पठाणने 70 चेंडूत 83 धावांची खेळी केली होती. या सामन्यात भारताने लंकेसमोर 350 धावांचा डोंगर उभा केला होता. हा सामना भारताने 152 धावांनी जिंकला.