
मुंबई इंडियन्सने काल सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चार विकेट राखून विजय मिळवला. हैदराबादने विजयासाठी दिलेलं 163 धावांच लक्ष्य मुंबई इंडियन्सने 19 व्या शतकात पार केलं. यंदाच्या सीजनमधील मुंबई इंडियन्सचा हा तिसरा विजय आहे. कालच्या सामन्यात एक घटना घडली. सहसा मैदानावर असं दृश्य दिसत नाही. मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी संतापल्याच दिसलं. सनरायजर्स हैदराबादच्या इनिंगमध्ये हार्दिक पांड्या 8 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर ट्रेविस हेडने बॅकवर्ड पॉइंटला कट मारला.
चेंडू हवेत होता. MI चा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने उजव्या बाजूला झेप डाइव्ह मारली. पण त्याला कॅच घेता आली नाही. चेंडू सीमारेषेपार गेला. त्यावर हार्दिक पंड्या खूप चिडला. डगआऊटमध्ये बसलेल्या फ्रेंचायजी मालक नीता अंबानी या सुद्धा संतापल्याच दिसत होतं.
धावा बनवण्यासाठी संघर्ष
ट्रेविस हेड म्हणा फार मोठी खेळी करु शकला नाही. 29 चेंडूत 28 धावा करुन तो आऊट झाला. या दरम्यान त्याने 3 चौकार मारले. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज विल जॅक्सने त्याला सँटनरकरवी कॅचआऊट केलं. ट्रेविस हेडचा मुंबई इंडियन्सविरुद्ध धावा बनवण्यासाठी संघर्ष सुरु होता. त्याने 96.55 च्या स्ट्राइक रेटने 28 धावा केल्या.
The reactions of Nita Ambani.#MIvSRH pic.twitter.com/fqXZMMQvwF
— The sports (@the_sports_x) April 17, 2025
पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सची टीम कितव्या स्थानी?
मुंबई इंडियन्सची टीम या सीजनमध्ये 7 सामने खेळली असून त्यांनी तीन विजय मिळवले आहेत. चार सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सची टीम सातव्या स्थानावर आहे. सनरायजर्स हैदराबादने फक्त दोन सामने जिंकले आहेत. ते 9 व्या स्थानावर आहेत.