Harmanpreet Kaur: शेफाली वर्मा एकटी लढली, तरीही हरमनप्रीत कौरकडून भलत्याच खेळाडूंचे कौतुक, असं का?
Womens Asia Cup Final 2026: भारत आणि बांगलादेश यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाचा विजय झाला. या विजयानंचर कर्णधार हरमनप्रीत कौरने जे विधान केले त्याची आता चर्चा रंंगली.

Womens Asia Cup 2026: भारतीय संघाची आता थाटात फायनलमध्ये एन्ट्री झाली आहे. भारतीय महिला संघा आशिया कप ट्रॉफी उंचवण्यापासून आता एक पाऊल दूर आहे. भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये बांगलादेशसोबत लढत झाली. सेमीफायलनच्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय पाहायला मिळाली. आता भारतीय संघ फायनलमध्ये पाकिस्तानसी भिडण्याची शक्यता आहे. आता सेमीफायनलमधील प्रभावी कामगिरीनंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने एक विधान केले आहे.
हरमनप्रीत कौर काय म्हणाली?
हरमनप्रीत कौर म्हणाली, “ज्या प्रकारे गोष्टी पुढे जात आहेत, ज्या प्रकारे आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी करत आहोत, त्यामुळे मी नक्कीच खूप आनंदी आहे. या खेळपट्टीवर चांगल्या चेंडूंना पूर्ण फायदा मिळत होता. जर तुम्ही चेंडू योग्यरित्या फिरवत असाल, तर त्याचे परिणाम मिळत होते. दोन्ही संघांच्या फिरकी गोलंदाजांनी आज उत्कृष्ट गोलंदाजी केली. फलंदाजांना धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, परंतु खेळपट्टीने फिरकी गोलंदाजांना खूप मदत केली आणि त्यांनी त्याचा चांगला उपयोग करून घेतला.”
ती म्हणाली, “अशा खेळपट्टीवर, जिथे परिस्थिती अनिश्चित असते, तिथे छोट्या भागीदारी महत्त्वाच्या ठरतात. आज फलंदाजी करताना आमच्या झालेल्या सर्व भागीदारी महत्त्वाच्या होत्या. रिचा घोषनेही काही अप्रतिम फटके मारले. दीप्ती गोलंदाजीत उत्कृष्ट होती. जेव्हा जेव्हा आम्हाला तिची गरज होती, तेव्हा तिने जबाबदारी स्वीकारली आणि आम्हाला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले.” जी शेफाली वर्मा मॅचविनर ठरली तिचेच नाव घ्यायचे हरमनप्रीत कौर विसरली.
प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत १४९/६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यात शेफाली वर्माच्या ४० चेंडूंतील वेगवान ६४ धावा, हरमनप्रीत कौरच्या नाबाद २४ धावा, रिचा घोषच्या २१ धावा आणि दीप्ती शर्माच्या ६ चेंडूंतील १३ धावांच्या छोटेखानी खेळीचा समावेश होता. प्रत्युत्तरात, बांगलादेश २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १०९ धावाच करू शकला आणि भारताने हा सामना ४० धावांनी जिंकला. आता भारतीय संघ फायनलमध्ये कोणाशी भिडेल हे लवकरच समजेल.