AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : अभिजीत दिपके आणि मनोज जरांगे यांची आज दुपारी भेट

| Updated on: Sep 11, 2026 | 8:12 AM
Share

Maharashtra News LIVE : मराठा आरक्षणावरून आता निर्णायक लढा सुरू करण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. उद्या मुंबईतील मोर्चाविषयीची रुपरेषा ते मांडतील. दरम्यान अभिजीत दिपके आणि मनोज जरांगे याची आज दुपारी भेट होणार आहे.

Maharashtra News LIVE : अभिजीत दिपके आणि मनोज जरांगे यांची आज दुपारी भेट
टीव्ही ९ मराठी ब्लॉगImage Credit source: टीव्ही ९ मराठी

LIVE NEWS & UPDATES

  • 11 Sep 2026 08:40 AM (IST)

    धाराशिव च्या कसबे तडवळे येथे रात्री 12 वाजे दरम्यान मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

    लातूर-पुणे महामार्गावर तेरणा नदी पुलावर लाकडे पेटवून आंदोलन करण्यात आले. यामुळे दोन तास वाहतूक ठप्प होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथे मराठा आंदोलक आक्रमक झाले. लातूर-पुणे मार्गावरील तेरणा नदी पुलावर लाकडे पेटवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.रात्री सुमारे दोन तास आंदोलकांनी रस्ता रोखून धरल्याने लातूर-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

  • 11 Sep 2026 08:30 AM (IST)

    गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी टोल माफी पास

    गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी टोल माफी पासच वितरण सुरू झाले आहे. पुणे आरटीओ कडून आत्तापर्यंत 40 पेक्षा जास्त व्यक्तींना टोलमाफीचे पास देण्यात आले आहे. टोल माफीचा लाभ घेण्यासाठी वाहनधारकांनी वाहनाची सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचा आवाहन करण्यात आले आहे. पुण्यातील आळंदी रस्ता आणि दिवे येथील कार्यालयामध्ये हे पास उपलब्ध करून दिले आहेत भाविकांनी आवश्यक कागदपत्रे पूर्तता करून लाभ घेण्याचा आवाहन करण्यात आले आहे.

  • 11 Sep 2026 08:20 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात १३४ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’

    नंदुरबार जिल्ह्यात १३४ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबवली जात आहे. गणेशोत्सवातून सामाजिक सलोखा आणि एकोपा वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात या संकल्पनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. ग्रामीण भागासोबतच आता शहरी भागातही ‘एक वॉर्ड, एक गणपती’ संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. एक गाव, एक गणपतीमुळे गावातील नागरिकांमध्ये एकोपा वाढणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • 11 Sep 2026 08:10 AM (IST)

    गणरायाच्या स्वागतासाठी फुलांचे भाव तेजीत

    गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच शहरातील फुल बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाला आहे मंडपाची सजावट आरास हरामी पूजेसाठी आघाऊ तसेच किरकोळ बाजारात मुलांना मागणी वाढली आहेत बाजारात दाखल होणाऱ्या फुलांच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने झेंडू, शेवंती भावात 30 टक्क्यांनी वाढ झाली तर गुलछडी चे भाव दुप्पट झाले आहेत

  • 11 Sep 2026 08:00 AM (IST)

    जालन्यात बैलपोळा सणाचा उत्साह, सन्मान चिन्ह देऊन सत्कार

    भाटेपूरी गावात पोळा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उत्कृष्ट सजवलेल्या बैलजोड्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भाटेपूरी गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही पोळा सण अत्यंत थाटामाटात आणि नेहमीपेक्षा अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या वर्षीच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे गावात आयोजित करण्यात आलेला विशेष सत्कार समारंभ. गावातील सर्व शेतकर्‍यांनी आपल्या बैलजोड्यांना विविध रंगीबेरंगी मोरप्या, बाशिंगे, झूल, घुंगुरमाळा आणि आकर्षक रंगांनी अत्यंत सुंदर रीतीने सजवले होते. या सजवलेल्या बैलजोड्यांमधून उत्कृष्ट आणि आकर्षक सजावट केलेल्या बैलजोड्यांची निवड करून त्यांच्या मालकांना सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.

  • 11 Sep 2026 07:54 AM (IST)

    जरांगे पाटलांच्या उपोषणाचा चौदावा दिवस, प्रकृती खालावल्याने उपचार सुरू

    राष्ट्रवादीच्या आमदारांनी परवा रात्री केलेल्या चर्चेनंतर अद्याप कुठलेच उत्तर मिळाले नाही, गेल्या चार दिवसांपासून शिष्टमंडळाची चर्चा नाही. उद्या दुपारी 12 वाजता अंतरवालीत निर्णायक बैठक, आंदोलनाबाबत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रकृती खालावल्याने रात्री उशिरापासुन पुन्हा उपचार सुरू करण्यात आले असुन वैद्यकीय पथकाकडून 24 तास लक्ष ठेवले जात आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे. गेल्या आठवडाभरापासून सरकारचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत फिरकलेले नाही. तर उद्या मुंबईतील धडकणाऱ्या मोर्चाविषयी जरांगे पाटील रुपरेषा मांडतील. दरम्यान आज कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके हे मनोज जरांगे पाटील यांची दुपारी भेट घेणार आहेत. भंडारा आणि महाप्रसादाविषयी अन्न आणि औषध प्रशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एमपीएससी पेपरफुटीचा मुद्दा राज्यात पेटला आहे. अनेक शहरातील परीक्षार्थी, उमेदवार रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या आंदोलनाला काँग्रेस आणि आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे. तर एमपीएससीतील परीक्षांची एसआयटी चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हवामान खात्यानुसार आजपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरीत राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावू शकतो. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पावसाने ओढ दिल्यास मराठवाड्यावर जलसंकट आणि दुष्काळाचे सावटाची टांगती तलवार आहे.

तर दिल्लीत उद्यापासून BRICS शिखर परिषद होत आहे. या परिषदेला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्यासह इतर देशातील नेतृत्व भारतात येणार आहे. 12-13 सप्टेंबर दरम्यान ब्रिक्स परिषद होईल. भारत मंडपममध्ये होणाऱ्या या परिषदेत व्लादीमीर पुतीन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, इराणचे राष्ट्रपती मसूज पेजेशकियन, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांचा सहभाग असेल. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेस हे पण सहभागी होतील .

Published On - Sep 11,2026 7:54 AM

Follow Us
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...