AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharat Saxena: वेदनेनं त्रस्त शरत सक्सेना, उभं राहून केलं MRI; फोटो पाहून चाहते चिंतेत

शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा होऊन पुन्हा पूर्वीप्रमाणे चालता यावं आणि काम करता यावं, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनाचं चाहते कौतुक करत असून, सोशल मीडियावर कमेंट्सच्या माध्यमातून त्यांना धीर आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Sharat Saxena: वेदनेनं त्रस्त शरत सक्सेना, उभं राहून केलं MRI; फोटो पाहून चाहते चिंतेत
शरत सक्सेनाImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 11, 2026 | 8:14 AM
Share

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना यांच्या तब्येतीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 76 वर्षीय शरत सक्सेना यांच्या लंबर स्पाइनशी संबंधित समस्येवर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. या सर्जरीपूर्वी त्यांनी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ‘स्टँडिंग MRI’ म्हणजेच उभं राहून MRI तपासणी केली. या तपासणीचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले असून, ते पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं आहे. शरत सक्सेना यांनी त्यांच्या आरोग्याविषयीची माहिती स्वतः चाहत्यांसोबत शेअर केली. त्यांच्या पोस्टमधील फोटोमध्ये ते हॉस्पिटलमध्ये MRI तपासणी करताना दिसत आहेत. शस्त्रक्रियेनंतर पुन्हा व्यवस्थित चालता यावं आणि काम करता यावं, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या भावनिक अपडेटनंतर चाहत्यांनी तसेच इंडस्ट्रीतील अनेकांनी त्यांच्या लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

काय आहे ‘स्टँडिंग MRI’?

सामान्य MRI तपासणीमध्ये रुग्णाला मशीनमध्ये आडवं झोपवून शरीराच्या आतील भागांचे स्कॅन केले जाते. मात्र ‘स्टँडिंग MRI’मध्ये रुग्ण उभ्या स्थितीत असताना तपासणी केली जाते. विशेषतः मणक्याशी संबंधित काही समस्या तपासताना शरीरावर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम झाल्यानंतर मणक्याची स्थिती कशी आहे, हे समजण्यास या तपासणीची मदत होऊ शकते.

शरत सक्सेना यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत हिंदीसह विविध भारतीय भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या दमदार व्यक्तिमत्त्वामुळे खलनायक आणि सहाय्यक भूमिकांमध्ये त्यांची विशेष ओळख निर्माण झाली. ‘मिस्टर इंडिया’मधील डागा आणि ‘बजरंगी भाईजान’मधील करीना कपूरच्या वडिलांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. नुकतेच ते अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार 2’मध्येही दिसले होते. आता शरत सक्सेना यांच्या लंबर स्पाइनची शस्त्रक्रिया होणार असल्याने चाहते त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.

शरत सक्सेना यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या दमदार शरीरयष्टीमुळे अॅक्शन आणि निगेटिव्ह भूमिकांमध्ये त्यांची वेगळी छाप पडली. मात्र, वयाच्या या टप्प्यावर मणक्याशी संबंधित समस्येला सामोरं जावं लागत असल्याने त्यांच्या चाहत्यांना चिंता वाटत आहे.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...