ज्यूनियर वेटलिफ्टींग चॅम्पियनशिपमध्ये हर्षदा गरुडने रचला इतिहास, भारताची मान उंचावली

याच वजन कॅटेगरीत दुसरी भारतीय अंजली पटेलने पाचव स्थान मिळवलं. तिने एकूण 148 किलो वजन उचललं. यात स्नॅचमध्ये 67 किलो, तर क्लीन-जर्कमध्ये 81 किलो वजन उचललं.

ज्यूनियर वेटलिफ्टींग चॅम्पियनशिपमध्ये हर्षदा गरुडने रचला इतिहास, भारताची मान उंचावली
Harshada Sharad Garud win gold
Image Credit source: ANI
| Updated on: May 02, 2022 | 9:52 PM

मुंबई: हर्षदा शरद गरुड (Harshada Sharad Garud)  या युवा वेटलिफ्टरने सोमवारी इतिहास रचला. ज्यूनियर स्तरावरील आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप (Weightlifting Championship) स्पर्धेत तिने सुवर्णपदक (Gold medal) मिळवलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. 45 किलो कॅटेगरीत तिने 153 किलो वजन उचललं. स्नॅचमध्ये 70 किलो आणि क्लीन-जर्कमध्ये तिने 83 किलो वजन उचललं. पोडियमवर तिने अव्वल स्थान मिळवलं. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी हर्षदाने भारतासाठी सुवर्णपदक विजेती कामगिरी केली. तिने आठ स्पर्धकांना मागे सोडलं. टर्कीच्या बेकतास कॅनस्युने रौप्यपदक मिळवलं, तर मोलडोव्हाच्या टीओडोराने कास्य पदक मिळवलं.

अंजली पटेलने पाचव स्थान मिळवलं

याच वजन कॅटेगरीत दुसरी भारतीय अंजली पटेलने पाचव स्थान मिळवलं. तिने एकूण 148 किलो वजन उचललं. यात स्नॅचमध्ये 67 किलो, तर क्लीन-जर्कमध्ये 81 किलो वजन उचललं.

हर्षदाच्या आधी फक्त दोन भारतीयांनी जिंकलं मेडल

हर्षदाच्या आधी फक्त दोन भारतीयांना ज्यूनियर स्तरावर आंतराष्ट्रीय वेटलिफ्टींग चॅम्पियनशिपमध्ये पदक विजेती कामगिरी करता आली आहे. 2013 मध्ये मीरबाई चानूने कास्यपदक जिंकले होते. चिंता शेउलीने मागच्यावर्षी रौप्यपदक विजेती कामगिरी केली होती.