Video | छोट्याशा मुलीचं वेटलिफ्टिंग, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, मीराबाई चानू यांनी केली वाहवा

सध्या चानू यांची प्रेरणा घेणारी अशीच एक छोटीशी मुलगी चर्चेचा विषय ठऱत आहे. या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून खुद्द चानू यांनीदेखील या मुलीची दखल घेतलीय.

Video | छोट्याशा मुलीचं वेटलिफ्टिंग, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, मीराबाई चानू यांनी केली वाहवा
little weightlifter
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jul 27, 2021 | 4:30 PM

मुंबई : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू यांची सर्व स्तरावर वाहवा केली जात आहे. चानू यांनी सिल्व्हर मेडल पटकावल्यामुळे त्यांचे भारतात सर्वत्र स्वागत केले जात आहे. चानू कित्येक तरुण आणि तरुणींसाठी आदर्श ठरत आहेत. सध्या चानू यांची प्रेरणा घेणारी अशीच एक छोटीशी मुलगी चर्चेचा विषय ठऱत आहे. या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून खुद्द चानू यांनीदेखील या मुलीची दखल घेतलीय. (Satish Sivalingam daughter weight lifting video went viral on social media)

व्हिडीओमध्ये दिसणारी लिटल वेटलिफ्टर सतीश यांची मुलगी

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ sathish sivalingam weightlifter यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी लिटल वेटलिफ्टर ही सतीश यांची मुलगी आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर काही क्षणांत व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सतीश यांची मुलगी वेटलिफ्टिंग करताना दिसत आहे. या छोट्या मुलीच्या मागे एक मोठा टीव्ही आहे. या टीव्हीमध्ये मीराबाई चानू वेटलिफ्टिंग करताना दिसत आहेत. मीराबाई चानू जशा वेटलिफ्टिंग करत आहेत. अगदी तशीच नक्कल व्हिडीओतील छोटीशी मुलगी करत असल्याचे दिसत आहे.

चानू यांनी रिट्विट करत मुलगी खूप आवडल्याची प्रतिक्रिया

मागे टीव्हीमध्ये मीराबाई चानू यांनी वेटलिफ्टिंग केल्यानंतर प्रेक्षकांना नमस्कार केला आहे. अगदी तशाच पद्धतीने व्हिडीओतील मुलीनेसुद्धा प्रेक्षकांना नमस्कार केला आहे. या व्हिडीओला चानू यांनी रिट्विट करत मला ही मुलगी खूप आवडल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ सध्या ट्विटर आणि इतर माध्यमांवर मोठ्या आवडीने शेअर केला जात आहे. तसेच या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स केल्या जात आहेत. ही छोटी मुलगी खरंच प्रेरणादायी आहे, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने ही मुलगी छोटी मीराबाई चानू होण्याचा प्रयत्न करतेय, अशी मार्मिक प्रतिक्रिया दिलीय. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | भोजपुरी गाण्यावर चिमुकली थिरकली, जबरदस्त डान्सचा व्हिडीओ व्हायरल

Video | दहा वर्षाच्या मुलीवर लांडग्याचा अचानकपणे हल्ला, छोट्याशा कुत्र्याने वाचवलं, व्हिडीओ व्हायरल

Video | जोशपूर्ण वातावरणात पोलिसांची परेड, मध्येच माकड आले अन् घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?

(Satish Sivalingam daughter weight lifting video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें