Video | दहा वर्षाच्या मुलीवर लांडग्याचा अचानकपणे हल्ला, छोट्याशा कुत्र्याने वाचवलं, व्हिडीओ व्हायरल

ही घटना कॅनडा येथील असून कोयोट प्रजातीच्या लांडग्याने लिली या मुलीवर हल्ला केला होता. याच लिलीचे संरक्षण एका छोट्याशा कुत्र्याने केले आहे.

Video | दहा वर्षाच्या मुलीवर लांडग्याचा अचानकपणे हल्ला, छोट्याशा कुत्र्याने वाचवलं, व्हिडीओ व्हायरल
dog viral video
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 7:00 PM

मुंबई : असं म्हणतात की कुत्रा सर्वात इमानदार प्राणी असतो. गरज पडल्यास स्वत:चा जीव धोक्यात घालून तो आपल्या मालकाचे रक्षण करतो. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. एका चोट्याशा मेस्सी नावाच्या कुत्र्याने त्याच्या दहा वर्षीय मालकिनीचे प्राण वाचवले आहेत. ही घटना कॅनडा येथील असून कोयोट प्रजातीच्या लांडग्याने लिली नावाच्या मुलीवर हल्ला केला होता. याच लिलीचे संरक्षण एका छोट्याशा कुत्र्याने केले आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून लोक कुत्र्याच्या इमानदारीचे कौतूक करत आहेत. (small dog fight with coyote wolf to protect 10 year old children video went viral on social media)

नेमकी घटना काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार सध्या व्हायरल होता असलेला व्हिडीओ हा कॅनडा येथील आहे. या व्हिडीओमध्ये एक दहा वर्षाची लिली नावाची मुलगी दिसत आहे. ही मुलगी आपल्या मेस्सी नावाच्या कुत्र्याला घेऊन बाहेर फिरायला गेली होती. मात्र, यावेळी लांडग्याची एक प्रजाती असलेल्या कोयोटने या मुलीवर हल्ला केला. समोर आलेला लांडगा पाहून ही 10 वर्षांची मुलगी चांगलीच घाबरली. लांडगा पाहताच तिने कुत्र्याला जागेवरच सोडून पळ काढला. तर लांडगासुद्धा या मुलीच्या मागे लागल्याचे आपल्याला व्हिडीओमध्ये दिसते.

छोट्याशा कुत्र्याने लांगड्याशी दोन हात केले

मात्र, याच वेळी मेस्सी या कुत्र्याने लांगड्याशी दोन हात केले आहेत. जीव लहानजरी असला तर या कुत्र्याने लांडग्याला जेरीस आणलेय. आपली मालकीन म्हणजेच दहा वर्षीय लिली जोपर्यंत सुरक्षित ठिकाणी पोहोचत नाही, तोपर्यंत छोट्या कुत्र्याने लांडग्याला विरोध केला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

शेवटी छोटासा कुत्रा लांडग्याशी लढत असल्याचे समजताच दाहा वर्षीय मुलीने पळ काढून लोकांना बोलावून आणले. हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसेच चोट्याशा कुत्र्याची वाहवा करत आहेत.

इतर बातम्या :

Video | जोशपूर्ण वातावरणात पोलिसांची परेड, मध्येच माकड आले अन् घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?

VIDEO : पाठीवर सहा पिल्लांना घेऊन भिंत चढण्याचा प्रयत्न, या प्राण्याचे कारनामे पाहून तुम्हीही थक्क व्हाल! 

Himachal Landslide : आयुष्यातील सुंदर प्रवासानं केला घात, सोलो ट्रीपवर गेलेल्या डॉक्टरचं शेवटचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल

(small dog fight with coyote wolf to protect 10 year old children video went viral on social media)

Non Stop LIVE Update
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.