Video | जोशपूर्ण वातावरणात पोलिसांची परेड, मध्येच माकड आले अन् घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ मूड फ्रेश करणारा आहे. या व्हिडीओमध्ये परेडदरम्यान एका माकडामुळे चांगलीच मजा आली आहे.

Video | जोशपूर्ण वातावरणात पोलिसांची परेड, मध्येच माकड आले अन् घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?
monkey attack on police
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jul 26, 2021 | 3:41 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार असतात, तर काही व्हिडीओंना पाहून आपण थक्क होऊन जातो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ मूड फ्रेश करणारा आहे. या व्हिडीओमध्ये परेडदरम्यान एका माकडामुळे चांगलीच मजा आली आहे. (monkey attack on police commander while pared video went viral on social media)

शिस्तबद्ध पद्धतीने पोलिसांची परेड

व्हायरल होणारा व्हिडीओ अतिशय खास असून त्यामध्ये घडलेला प्रसंग पाहून तुम्हा हसू फुटेल. हा व्हिडीओ एका परेडदरम्यानचा आहे. एका मोकळ्या मैदानावर पोलीस कर्मचारी परेड करत असल्याचे दिसत आहे. परेडदरम्यान सर्व पोलीस अगदी शिस्तबद्ध पद्धतीने परेड करत आहेत. कदम ताल करत करत सगळे पोलीस मानवंदना देत आहेत. हा सर्व प्रसंग पाहून अंगात स्फुरण चढावे असे वातावरण आहे. परेडमधील सर्व पोलिसांना दिशा देणारा एक कमांडरसुद्धा व्हिडीओमध्ये दिसतो आहे. हा कमांडर पोलिसांना वेगवेगळे निर्देश देत आहे.

माकडाने येऊन जोरदार धक्का दिला

मात्र, या वेळी अचानकपणे एक घटना घडली आहे. ही घटना पाहून सर्वांनाच हसू फुटले आहे. परेड सुरु असताना कमांडरच्या मागे अचानकपणे एक माकड आलेय. या माकडाने मागून येत कमांडरवर हल्ला केलाय. माकडाने जोरदार धक्का दिल्यामुळे परेडमधील कमांडरचा तोल गेलाय. तसेच जोराच्या धक्क्यामुळे तो कमांडर बाजूच्या पोलिसांच्या अंगावर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू फुटले आहे. जोशपूर्ण वातावरणात माकडाने येऊन केलेली ही हरकत लोकांना चांगलीच आवडली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही लोकांनी हा व्हिडीओ मजेदार असल्याचे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी माकडाच्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमीसुद्धा झाले असते, असे मत व्यक्त केले आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबात नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, सध्या या व्हिडीओला आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विट केले आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

VIDEO : पाठीवर सहा पिल्लांना घेऊन भिंत चढण्याचा प्रयत्न, या प्राण्याचे कारनामे पाहून तुम्हीही थक्क व्हाल! 

Himachal Landslide : आयुष्यातील सुंदर प्रवासानं केला घात, सोलो ट्रीपवर गेलेल्या डॉक्टरचं शेवटचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल

Video | बॉसने फटकारलं म्हणून तरुणी चिडली, थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न, थरारक व्हिडीओ व्हायरल

(monkey attack on police commander while pared video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें