ENG vs NZ Final Live : न्यूझीलंडचं इंग्लंडसमोर 242 धावांचं आव्हान

एकदाही विजेतेपदावर नाव न कोरलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगत आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानात आजचा सामना होत आहे.

ENG vs NZ Final Live : न्यूझीलंडचं इंग्लंडसमोर 242 धावांचं आव्हान
| Edited By: | Updated on: Jul 14, 2019 | 7:45 PM

England vs New zealand  लंडन : सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या क्रिकेट विश्वचषक 2019 चा अंतिम सामना आज होत आहे. विशेष म्हणजे यावेळचा अंतिम सामना एकदाही विश्वचषकावर नाव न कोरलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी 50 षटकात 8 विकेट गमावत इंग्लंडसमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले.

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानात आजचा सामना होत आहे. विशेष म्हणजे इंग्लंडने तब्बल 27 वर्षांनी फायनलमध्ये धडक दिली आहे. यंदाच्या विश्वचषक फायनलचा सामना ऐतिहासिक मानला जात आहे. इंग्लंडने आतापर्यंत 3 वेळा विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. मात्र, एकदाही विश्वचषक जिंकलेला नाही. दुसरीकडे आपल्या खेळाने भारतासारख्या मजबूत संघाला पराभूत करुन फायनलमध्ये धडक दिली. विशेष म्हणजे न्यूझीलंडने देखील आतापर्यंत एकही विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे दोन्ही संघ पहिल्यांदाच विश्वचषक जिंकण्यासाठी भिडले आहेत.

LIVE UPDATE 

[svt-event title=”सलामीवीर मार्टिग गप्टील माघारी, न्यूझीलंडला पहिला झटका” date=”14/07/2019,3:47PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”नाणेफेक जिंकून न्यूझीलंडची फलंदाजी” date=”14/07/2019,2:55PM” class=”svt-cd-green” ] न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, तर इंग्लंडची टीम फिल्डिंग करणार [/svt-event]

[svt-event title=”रात्रभर पडलेल्या पावसामुळे नाणेफेकीला विलंब” date=”14/07/2019,2:40PM” class=”svt-cd-green” ] लॉर्ड्सच्या मैदानावर अंतिम सामन्यापूर्वी प्रचंड पाऊस पडला. रात्रभर पडलेल्या पावसामुळे आता नाणेफेकीला विलंब झाला असून नाणेफेक 15 मिनिटे उशिराने होणार आहे. [/svt-event]