… म्हणून इंग्लंडमध्ये टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार

| Updated on: Jun 03, 2019 | 10:26 PM

लंडन : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला होतोय. या सामन्यापूर्वीच टीम इंडिया चर्चेत आहे. सोमवारी भारतीय संघाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण टीम इंडियाकडून एकाही खेळाडूला पत्रकार परिषदेला न पाठवल्यामुळे मीडियाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. पत्रकार परिषदेत भारतीय संघाच्या वतीने कोण बोलणार याची माहिती मीडियाला देण्यात आली नव्हती. […]

... म्हणून इंग्लंडमध्ये टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार
Follow us on

लंडन : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला होतोय. या सामन्यापूर्वीच टीम इंडिया चर्चेत आहे. सोमवारी भारतीय संघाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण टीम इंडियाकडून एकाही खेळाडूला पत्रकार परिषदेला न पाठवल्यामुळे मीडियाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. पत्रकार परिषदेत भारतीय संघाच्या वतीने कोण बोलणार याची माहिती मीडियाला देण्यात आली नव्हती.

या विश्वचषकात आयसीसीने एक प्रोटोकॉल तयार केलाय. याअंतर्गत प्रत्येक संघाला दररोजच्या कार्यक्रमाची माहिती मीडियाला द्यावी लागते. यामध्ये संघातील खेळाडूंचा सराव यासह पत्रकार परिषदेचीही माहिती देणं आवश्यक असतं. सोमवारी टीम इंडियाकडून साऊथेम्पटनमध्ये पत्रकार परिषद घेतली जाणार होती. पण भारतीय संघाचा एकही खेळाडू उपस्थित राहिला नाही.

काही वृत्तांनुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने मीडिया प्रतिनिधींनी सांगितलं की भारतीय संघाने अजून एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे ते पत्रकार परिषदेत काय बोलतील? शिवाय संघ व्यवस्थापनाकडून कळवण्यात आलं की गोलंदाज दीपक चहर आणि आवेश खान मीडियासोबत बातचीत करु शकतात. यानंतर संतापलेल्या मीडिया प्रतिनिधींनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडिया 24 मे रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत एकमेव खेळाडू म्हणजे केएल राहुलनेच मीडियासोबत संवाद साधलाय. राहुलने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली होती. त्यानंतर मीडियाशी संवाद साधला. तेव्हापासून आतापर्यंत मीडियाला भारतीय संघाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.