ICC ODI Rankings | विराट-रोहितची उत्कृष्ट कामगिरी, अढळ स्थान कायम; ‘यॉर्कर किंग’ बुमराहची ‘या’ क्रमांकावर घसरण

| Updated on: Dec 10, 2020 | 7:08 PM

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा एकदिवसीय मालिकेत 2-1 ने पराभव केला.

ICC ODI Rankings |  विराट-रोहितची उत्कृष्ट कामगिरी, अढळ स्थान कायम; यॉर्कर किंग बुमराहची या क्रमांकावर घसरण
Follow us on

दुबई : आयसीसी अर्थात (ICC) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वनडे क्रिकेटमधील फलंदाज आणि गोलंदाजांची रॅंकिग (ICC ODI Rankings) जाहीर केली आहे. या बॅटिंग रॅंकिगमध्ये पहिल्या 2 स्थानांवर टीम इंडियाचे खेळाडू आहेत. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि हिटमॅन रोहित शर्मा (Hitman Rohit Sharma) यांनी आपलं स्थान कायम राखलं आहे. तर गोलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Yorker King Jasprit Bumrah) याची एका क्रमांकाने घसरण झाली आहे. icc odi ranking jaspreet bumrah slips to third position virat and rohit retain position

विराटने ऑस्ट्रेलियाविरोधातील 3 वन डे सामन्यांच्या मालिकेत अनुक्रमे 21, 89, 63 अशा एकूण 173 धावा केल्या. विराट एकूण 870 रेटिंग्स पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर हिटमॅन रोहित शर्मालाही 842 पॉइंट्स दुसरं स्थान कायम राखण्यास यश आलं आहे.

बुमराहची घसरण

यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहची एका क्रमांकाने घसरण झाली आहे. बुमराहची दुसऱ्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. बांगलादेशच्या मुजीब उर रहेमानने बुमराहला पछाडत दुसरं स्थान पटकावलं आहे. बुमराहच्या नावावर एकूण 700 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर मुजीबच्या नावे 701 रेटिंग पॉइंट्स आहेत. बुमराहला ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिकेत फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.

टी 20 रॅकिंगमध्येही बोलबाला

टी 20 बॅट्समन रॅकिंगमध्येही टीम इंडियाच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. उप कर्णधार केएल राहुलला एका स्थानाचा फायदा झाला आहे. केएलने या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचला पछाडलं. यासह केएलने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. केएलच्या नावावर एकूण 816 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. केएलने या मालिकेतील 3 सामन्यात 81 धावा केल्या.

तसेच कर्णधार विराट कोहलीने नवव्या क्रमांकावरुन आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या मालिकेआधी विराट नवव्या क्रमांकावर होता. विराटने अफगाणिस्तानच्या हजरातुल्लाह जाजईला पछाडत आठवा क्रमांक पटकावला आहे. विराट ताज्या आकडेवारीनुसार 697 गुणांसह आठव्या क्रमांकावर विराजमान आहे. विराट या टी 20 मालिकेत टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. विराटने एकूण 3 सामन्यात 140 च्या स्ट्राईक रेटने आणि 44 च्या सरासरीने 134 धावा केल्या.

टीम इंडियाचा 2-1 ने पराभव

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिकेत 2-1 च्या फरकाने पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या 2 सामन्यात टीम इंडियाचा पराभव केला. तर तिसरा एकदिवसीय सामना जिंकत टीम इंडियाने शेवट गोड केला. तर टीम इंडियाने टी 20 मालिका जिंकंत एकदिवसीय मालिका पराभवाचा वचपा काढला. या टी 20 मालिकेनंतर आता कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. 17 डिसेंबरपासून पहिला कसोटी सामना खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

ICC T20I Batting Rankings | विराट आणि केएलची टी 20 मालिकेत शानदार कामगिरी, आयसीसी क्रमवारीत ‘या’ क्रमांकावर झेप

icc odi ranking jaspreet bumrah slips to third position virat and rohit retain position