ICC रँकिंग : कसोटी क्रिकेटमधील ‘टॉप 10’ फलंदाज आणि गोलंदाज

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By:

Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 असा विजय मिळवून इतिहास नोंदवणाऱ्या भारतीय संघातील अनेक फलंदाज, गोलंदाज आणि ऑलराऊंडर्सनी आयसीसी रँकिंगमध्येही उंच उडी घेतली आहे. सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम असून, या यादीत लक्ष वेधून घेतलं आहे ते चेतेश्वर पुजाराने. पुजाराने सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ICC रँकिंग: टॉप […]

ICC रँकिंग : कसोटी क्रिकेटमधील 'टॉप 10' फलंदाज आणि गोलंदाज

कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 असा विजय मिळवून इतिहास नोंदवणाऱ्या भारतीय संघातील अनेक फलंदाज, गोलंदाज आणि ऑलराऊंडर्सनी आयसीसी रँकिंगमध्येही उंच उडी घेतली आहे. सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम असून, या यादीत लक्ष वेधून घेतलं आहे ते चेतेश्वर पुजाराने. पुजाराने सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

ICC रँकिंग: टॉप 10 कसोटी फलंदाज

1. विराट कोहली (भारत) 2. केन विल्यमसन (न्यूझीलंड) 3. चेतेश्वर पुजारा (भारत) 4. स्टीव स्मिथ (ऑस्ट्रेलिया) 5. जो रूट (इंग्लंड) 6. डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) 7. हेन्री निकोल्स (न्यूझीलंड) 8. डीन एल्गर (दक्षिण आफ्रिका) 9. दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका) 10. एडन मर्क्रम (दक्षिण आफ्रिका)

ICC रँकिंग: टॉप 10 कसोटी गोलंदाज

1. कॅगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) 2. जेम्स अँडरसन (इंग्लंड) 3. पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) 4. वरनॉन फिलेंडर (दक्षिण आफ्रिका) 5. रवींद्र जडेजा (भारत) 6. मोहम्मद अब्बास (पाकिस्तान) 7. ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) 8. टिम साऊथी (न्यूझीलंड) 9. रविचंद्रन अश्विन (भारत) 10. जेसन होल्डर (वेस्ट इंडीज)

भारताने इतिहास रचला

विराट कोहलीच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला आहे. भारताने तब्बल 72 वर्षांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. चौथ्या सिडनी कसोटीत भारताचा विजय निश्चित होता, मात्र सलग अडीच दिवस पाऊस कोसळल्याने ऑस्ट्रेलिया लाजिरवाण्या पराभवापासून वाचली. सिडनी कसोटी अनिर्णित राहिली. त्यामुळे भारताने कसोटी मालिका 2-1 अशी खिशात घातली.

सिडनी कसोटीत 193 धावा ठोकणाऱ्या चेतेश्वर पुजाराला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आलाच शिवाय मॅन ऑफ द सीरिजचा किताबही पुजारालाच मिळाला. पुजाराने चार कसोटी सामन्यांमध्ये तीन शतकांसह तब्बल 521 धावा ठोकल्या.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI