#ShameOnICC : ढिसाळ नियोजन, सोशल मीडियावर ICC ट्रोल

| Updated on: Jun 14, 2019 | 11:24 AM

सोशल मीडियावर आयसीसीच्या ढिसाळ नियोजनाची खिल्ली उडवणारे जोक्स, मीम्स, व्हिडीओ, इमेजेस शअर केले जात आहेत.

#ShameOnICC : ढिसाळ नियोजन, सोशल मीडियावर ICC ट्रोल
Follow us on

Cricket World Cup 2019 | भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या ‘बलिदान बॅज’वरुन त्वरीत कारवाई करणाऱ्या आयसीसीचं वर्ल्डकपच्या नियोजनात मात्र प्रचंड हलगर्जीपणा दिसून येत आहे. चार वर्षातून एकदा आयोजित केलं जाणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपच्या नियोजनात प्रचंड ढिसाळपणा असल्याने, क्रिकेट रसिक चांगलेच संतापले आहेत. काल (13 जून) भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन संघातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. याच वर्ल्डकपमध्ये दोनहून अधिकवेळा क्रिकेट सामन्यावर पावसाचा परिणाम जाणवला. पावसावर नियंत्रण आणू शकत नसलं तरी पावसाआधी किंवा पाऊस पडण्याची शक्यता असताना जी खबरदारी घ्यायला हवी, त्यातही आयसीसी पुरती अयशस्वी ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच कालच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द झाल्याने आयसीसीला क्रिकेट रसिकांनी सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं आहे.

सोशल मीडियावर आयसीसीच्या ढिसाळ नियोजनाची खिल्ली उडवणारे जोक्स, मीम्स, व्हिडीओ, इमेजेस शअर केले जात आहेत. अनेकांनी कठोर शब्दात आयसीसीचा निषेध व्यक्त केला आहे. जगभरातून क्रिकेट रसिक केवळ वर्ल्डकप पाहण्यासाठी दुसऱ्या देशात जात असतात. यंदाही अनेकजण विविध देशातून केवळ वर्ल्डकपमधील क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी इग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. त्यात पावसामुळे दर दोन सामन्यांनंतर एक सामना पावसामुळे रद्द होत आहे किंवा अर्ध्यात गुंडाळला जात आहे. त्यामुळे अर्थात क्रिकेट रसिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे.

काल भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना होता. दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा सामना होता. भारत विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी सज्ज होता, तर न्यूझीलंडही सलग चौथ्या विजयासाठी खेळणार होती. मात्र, पावसाने दोन्ही संघाच्या तयारीवर पाणी फेरलं. त्यात आयसीसीनेही आपल्या ढिसाळ कारभाराचं दर्शन दिलं.

विशेषत: भारतीय क्रिकेट रसिकांनी आयसीसीच्या या ढिसाळ कारभारावर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. येत्या 16 तारखेला भारत विरुद्ध पाकिस्तान ही बहुप्रतीक्षित मॅच आहे. त्यात इंग्लंडमध्ये कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा वेळी आयसीसी आता काय तयारी करतेय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सोशल मीडियावरील ICC च्या ट्रोलिंगचे काही निवडक ट्वीट :