AUSW vs SA W, Final | “अंतिम फेरीच्या सामन्याचे आमच्यावर….”, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सुने लूस हीनं स्पष्टच सांगितलं.

| Updated on: Feb 24, 2023 | 10:30 PM

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर दक्षिण आफ्रिकन संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघ या स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. आतापर्यंत झालेल्या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही.

AUSW vs SA W, Final | अंतिम फेरीच्या सामन्याचे आमच्यावर...., दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सुने लूस हीनं स्पष्टच सांगितलं.
AUSW vs SA W, Final | "अंतिम फेरीच्या सामन्याचे आमच्यावर....", दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सुने लूस हीनं स्पष्टच सांगितलं.
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : टी 20 वुमन्स वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा 6 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर दक्षिण आफ्रिकन संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघ या स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. आतापर्यंत झालेल्या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. इतकंच काय तर साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकन संघावर सामन्यापूर्वीच दडपण असेल, असं मानलं जात आहे. मात्र दक्षिण आफ्रिकन कर्णधार सुने लूस हिने हा मुद्दा खोडून काढला. तसेच गेल्या दोन वर्षात आमचा आत्मविश्वास दुणावल्याचं सांगितलं आहे.

काय म्हणाली सुने लूस

“इंग्लंडने चांगला खेळ केला.आमच्याकडे जगातील सर्वोत्तम गोलंदाजी आहे आणि चांगल्या फलंदाजांसमोर हे विशेष.खाका एक चांगली गोलंदाज आहे, जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे.आज तिने चांगला खेळ केला.प्रेक्षकांचे आभार आणि आशा आहे की ते रविवारी अंतिम फेरीसाठी त्यांना पाठिंबा देतील. अंतिम फेरीचे कोणतेही दडपण नाही. संघ दोन वर्षांपासून कठोर परिश्रम करत आहे.अत्यंत चांगले क्रिकेट खेळत आहे.”, असं सुने लूस हीने सांगितलं.

दुसरीकडे, पराभवानंतर इंग्लंडची कर्णधार हीथर नाईट हीनेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “एक चांगला सामना झाला.आम्ही विजयाचा जवळ पोहोचलो होतो.पण त्यांच्या गोलंदाजीमुळे आम्हाला लक्ष्य गाठणं शक्य झालं नाही. आम्हाला T20 क्रिकेट कसे खेळायचे आहे याबद्दल माहिती आहे. मुलींनी ते स्वीकारले पण आज ते उतरलं नाही. प्रेक्षकांच्या सपोर्टमुळे आमच्यावर थोडा दबाव आला, पण शेवटी विजय हा विजय असतो. अंतिम सामना नक्कीच मी बघत असेल. पण मी तिथे नसेन. याचं श्रेय सुने आणि तिच्या संघाला.”, असं इंग्लंडची कर्णधार हीथर नाइट हीने सांगितलं.

टी20 वर्ल्डकपमध्ये या संघांनी जेतेपदावर कोरलं नाव

  • 2009 इंग्लंड (इंग्लंड विरुद्ध न्यूझीलँड), इंग्लंडने हा सामना 6 गडी राखून जिंकला.
  • 2010 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलँड) ऑस्ट्रेलियाने 3 धावांनी हा सामना जिंकला.
  • 2012 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 4 धावांनी हा सामना जिंकला.
  • 2014 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून हा सामना जिंकला.
  • 2016 वेस्ट इंडिज (ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज) वेस्ट इंडिजने 8 गडी राखून सामना जिंकला.
  • 2018 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून हा सामना जिंकला.
  • 2020 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत) ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी हा सामना जिंकला.

दक्षिण आफ्रिकन संघ- अन्नेरी डेर्कसन, लारा गुडाल, लॉरा व्होलवार्ट, अन्नेके बॉच, च्लोई ट्रायोन, डेलमारी टकर, मॅरिजेन कॅप्प, नदीन डि क्लर्क, सुने लूस (कर्णधार), सिनालो जाफ्ता, टाझमिन ब्रिट्स, अयाबोंगा खाका, मासबाटा क्लास, नोन्कुलुलेको म्लाबा, शबनिम इस्माईल.

ऑस्ट्रेलियन संघ- बेथ मूने, ग्रेस हॅरिस, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅनाबेल सुथरलँड, अशले गार्डनर, इलिस पेरी, हिथर ग्रॅहम, जेस जोनस्सेन, किम गार्थ, तहिला मॅग्राथ, अलिसा हीली, अलाना किंग, डार्सी ब्राउन, जॉर्जिया वारेहम, मेगन स्कूट.