Vaibhav Sooryavanshi VIDEO : 6,4,4, वैभव जिंकलसं मित्रा, सिराज विरुद्ध दाखवला क्लास, दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये दाखवलं वेगळं रुप
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी ईस्ट झोनकडून दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळत आहे. यावेळी वैभव सूर्यवंशीचा एक वेगळा क्लास पहायला मिळाला. त्याने टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज मोहम्मद सिराजचा चांगलाच समाचार घेतला.

Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy Final : टी 20 मध्ये दे दणादण फलंदाजी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची आता नवीन परीक्षा आहे. वैभव सूर्यवंशी आता टेस्ट मॅचमध्ये खेळत आहे. टेस्टमध्ये खेळताना तु्म्हाला संयम दाखवावा लागतो. टी 20 मधला सुपरस्टार जेव्हा टेस्टमध्ये खेळतो, तेव्हा ती त्याची एकप्रकारची परिक्षाच असते. वैभव सूर्यवंशीचा दुलीप ट्रॉफीच्या फायनलसाठी ईस्ट झोनच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर ही मॅच सुरु आहे. साऊथ झोन विरुद्ध ईस्ट झोन कडून खेळताना वैभव सूर्यवंशीने आपल्या बॅटिंगचा एक वेगळा नमुना दाखवला. त्याने फायनलमध्ये साऊथ झोनकडून खेळणाऱ्या मोहम्मद सिराजचा चांगलाच समाचार घेतला. वैभव आणि सिराजमधली ही लढाई ईस्ट झोन इनिंगच्या चौथ्या ओव्हरमध्ये दिसली. या लढतीत वैभव सूर्यवंशीने मोहम्मद सिराजवर वर्चस्व गाजवलं.
वैभव सूर्यवंशीने सिराजच्या ओव्हरमध्ये 14 धावा बाऊंड्री मारुन वसूल केल्या. साऊथ झोनकडून इनिंगची चौथी ओव्हर टाकायला आलेल्या सिराजच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला. ओव्हरच्या लास्ट बॉलवर त्याने आणखी एक चौकार मारला. अशा प्रकारे सिराजच्या एक ओव्हरमध्ये वैभव सूर्यवंशीने 14 धावा लुटल्या.
संयम आणि आक्रमकतेचा संयम दिसला
वैभव सूर्यवंशी आपल्या स्फोट बॅटिंगसाठी ओळखला जातो. पण दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये त्याचा अंदाज बदलेला दिसला. तो वेगळ्या भूमिकेत दिसला. वैभव नुसता फटकेबाजी करत नव्हता, तर विचारपूर्वक फटक्यांची निवड करत होता. दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये त्याच्या फलंदाजीत संयम आणि आक्रमकतेचा संयम दिसला.
दुसऱ्यांदा वैभवचं अर्धशतक हुकलं
वैभवने फलंदाजीत संयम जरुर दाखवला, मात्र तरीही तो फायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये हाफसेंच्युरी झळकवू शकला नाही. तो अर्धशतकापासून 6 धावा दूर असताना आऊट झाला. वैभव सूर्यवंशीला वेगवान गोलंदाज चमा मिलिंदने बाद केलं. वैभवने 37 चेंडूत 44 धावा फटकावल्या. यात 5 चौकार आणि 1 षटकार आहे. दुलापी ट्रॉफीमध्ये दुसऱ्यांदा वैभवचं अर्धशतक हुकलं. पहिल्या सेमीफायनलच्या दुसऱ्या इनिंगमध्ये तो 40 धावांवर बाद झाला होता.
4️⃣,6️⃣,4️⃣
Vaibhav Sooryavanshi on the charge with some delightful shots 🔥
The 50-run stand also comes up between Vaibhav and Abhimanyu Easwaran 🙌
Scorecard ▶️ https://t.co/KQf5Km69nk#DuleepTrophy | #SZvEZ pic.twitter.com/0XLR4LI50R
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 6, 2026
ईस्ट झोनला दमदार सुरुवात करुन दिली
वैभवने 44 धावा केल्या. पण अभिमन्यू ईश्वरनसोबत पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ईस्ट झोनला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 100 धावा केल्या.
