
AUS vs ENG : IPL 2026 साठी काल मिनी ऑक्शन पार पडलं. काही खेळडूंवर पैशांचा पाऊस पडला. यामध्ये एक नाव म्हणजे कॅमरुन ग्रीन. आयपीएल इतिहासातील तो सर्वाधिक महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. कॅमरुन ग्रीन ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. तो ऑलराऊंडर आहे. त्यामुळे त्याला विकत घेण्यासाठी फ्रेंचायजीनी इंटरेस्ट दाखवला. काल अबू धाबी येथे पार पडलेल्या मिनी ऑक्शनमध्ये कॅमरुन ग्रीनला 25.20 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं. केकेआरने त्याच्यासाठी इतकी रक्कम मोजली. पण इतके पैसे मोजून विकत घेतल्यानंतर कॅमरुन ग्रीन दुसऱ्याच दिवशी अपयशी ठरला. ऑक्शनच्या दुसऱ्यादिवशी म्हणजे आज 17 डिसेंबरला आज कॅमरुन ग्रीन एडिलेड टेस्टमध्ये फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पहिल्या डावात ग्रीन एक रन्सही करु शकला नाही. तो शुन्यावर बाद झाला.
कॅमरुन ग्रीनने फक्त दोन चेंडूंचा सामना केला. एकही धाव न करता आर्चरच्या गोलंदाजीवर तो आऊट झाला. पहिल्यादिवशी लंचनंतर ग्रीन फलंदाजी करत होता. आर्चरने 138 KMPH वेगाने चेंडू टाकला. ग्रीनने त्या चेंडूवर मिडविकेटला उभ्या असलेल्या कार्सला सोपा झेल दिला.
ग्रीनच्या आधी कोणाच्या नावावर महागड्या खेळाडूचा रेकॉर्ड होता?
आयपीएल ऑक्शन 2026 मध्ये कॅमरुन ग्रीनला KKR ने 25.20 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. या रक्कमेसह ग्रीनने आयपीएलमध्ये मिचेल स्टार्कच्या नावावर असलेला सर्वात महागड्या परदेशी खेळाडूचा रेकॉर्ड मोडला. मिचेल स्टार्कला सुद्धा kkr ने 24.75 कोटींमध्ये विकत घेतलं होतं. एडिलेड टेस्ट मॅचमध्ये ग्रीनने इतक्या स्वस्तात बाद होणं ही केकेआरसाठी चांगली बातमी नाही. याआधी सुद्धा इंग्लंड विरुद्ध दोन टेस्ट मॅचच्या दोन इनिंगमध्ये चांगल्या सुरुवातीला ग्रीन मोठ्या खेळीमध्ये बदलू शकला नव्हता. पर्थमध्ये तो 24 आणि ब्रिसबेनमध्ये 45 धावांची इनिंग खेळलेला.
ऑस्ट्रेलिया 2-0 ने आघाडीवर
कॅमरुन ग्रीन आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि आरसीबी या दोन टीम्सकडून खेळला आहे. 2023 मध्ये मुंबई त्यानंतर 2024 मध्ये त्याला ट्रेड करुन आरसीबीकडे देण्यात आलं. एडिलेड येथे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये Ashes सीरीजचा तिसरा सामना सुरु आहे. याआधी दोन्ही कसोटी सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया 2-0 ने आघाडीवर आहे.