आज IND vs PAK मॅचचा थरार, पाकची जिरवण्यासाठी वैभव सज्ज, कधी, कुठे अन् किती वाजता पाहला महामुकाबला?
IND vs PAK Match Asia Cup Rising Stars: भारत पाकिस्तान यांच्यात आज सामना रंगणार आहे. हा सामना आज कधी, कुठे आणि किती वाजता रंगणार हा सामना एकदा पाहा...

IND vs PAK Match: आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ च्या आठव्या सामन्यात आता भारत ‘अ’ संघाचा सामना पाकिस्तान ‘अ’ संघाशी होईल. आपल्या पहिल्या सामन्यात, तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’ संघाने नेपाळचा ३०६ धावांनी मोठा पराभव केला. ३३२ धावा केल्यानंतर भारताने नेपाळला २६ धावांवर गुंडाळले. पाकिस्तानने युएईचा पराभव केला. २४५ धावा केल्यानंतर पाकिस्तानने युएईला १८४ धावांवर रोखले. या स्पर्धेचे आयोजन कतारमध्ये होत आहे. या सामन्याचा विजेता संघ जवळपास निश्चितपणे उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.
भारत ‘अ’ आणि पाकिस्तान ‘अ’ संघ कधी खेळतील?
भारत ‘अ’ विरुद्ध पाकिस्तान ‘अ’ सामना २२ नोव्हेंबर (रविवार) रोजी खेळला जाईल.
भारत ‘अ’ आणि पाकिस्तान ‘अ’ संघ कुठे भिडतील?
भारत ‘अ’ आणि पाकिस्तान ‘अ’ संघ दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भिडतील.
आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारत ‘अ’ विरुद्ध पाकिस्तान ‘अ’ सामना किती वाजता सुरू होईल?
भारत ‘अ’ विरुद्ध पाकिस्तान ‘अ’ सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल.
भारत ‘अ’ विरुद्ध पाकिस्तान ‘अ’ सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
भारत ‘अ’ विरुद्ध पाकिस्तान ‘अ’ सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
एशिया कप रायझिंग स्टार्समधील भारत ‘अ’ विरुद्ध पाकिस्तान ‘अ’ सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) कुठे पाहता येईल?
हा एशिया कप रायझिंग स्टार्स सामना सोनी लिव्ह ॲपवर थेट प्रक्षेपित केला जाईल.
भारत ‘अ’: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, शहबाज अहमद, विप्रज निगम, हर्षित राणा, प्रिन्स यादव, तनुष कोटियन, प्रभसिमरन सिंग, हर्ष दुबे, अर्शद खान.
पाकिस्तान अ: शमील हुसैन, माझ सदाकत, रोहेल नझीर, हसन नवाज, अब्दुल समद (c), फरहान युसूफ, साद मसूद, मोहम्मद इम्रान रंधावा, अहमद दानियाल, सुफियान मोकीम, अली रझा, शाहजेब खान, हैदर अली, मोहम्मद हसनैन, दानिश अझीझ