Vaibhav Sooryavanshi: सेमीफायनल गाजवण्यासाठी वैभव सज्ज, पठ्ठ्या आता श्रीलंकेशी भिडणार, पण सामन्याची वेळ बदलली, किती वाजता?
IND A vs SL A Semifinal: भारत आणि श्रीलंका यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. वैभव सूर्यर्वंशी आता दुबईनंतर श्रीलंकेची लंका लगावणार आहे.

IND A vs SL A Semifinal: भारतीय ‘अ’ संघाचा आज एक महत्त्वाचा सामना आहे. एशिया कप रायझिंग स्टार्सचा साखळी टप्पा संपला आहे. आता उपांत्य फेरीच्या सामन्यांची पाळी आहे. भारतीय संघ आज पहिला उपांत्य सामना खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका ‘अ’ संघ एकमेकांविरुद्ध लढणार आहे. कितीला सुरु होणार सामना, किती वाजता रंगणार सामना ते जाणून घ्या…
एशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ मधील भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला उपांत्य सामना आज खेळला जाईल. हा सामना दोहा येथे होणार आहे, जिथे यापूर्वीचे सामनेही खेळले गेले आहेत. या स्पर्धेचे मीडिया हक्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. तुम्हाला सामना टीव्हीवर पाहायचा असेल, तर तुम्ही तो सोनी स्पोर्ट्सवर पाहू शकता. तुम्हाला सामना मोबाईलवर पाहायचा असेल, तर तुम्ही सोनी लिव्ह ॲपवर जाऊ शकता. तुम्ही टॅब्लेट आणि लॅपटॉपवरही सोनी लिव्हवर सामना थेट पाहू शकता.
शिवाय, सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक अर्धा तास आधी, म्हणजेच दुपारी ३ वाजता होईल. जर सामना पूर्ण ५० षटकांपर्यंत चालला, तर तो रात्री ११ वाजेपर्यंत चालू शकतो. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी श्रीलंकेनेही चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे भारतीय संघाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. दुबईविरुद्धचा सामना सकाळी सुरु झाला होता. यामुळे या सामन्याची वेळ बदलली आहे. दुसरा उपांत्य सामना शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाईल. विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल, त्यानंतर रविवार, २९ नोव्हेंबर रोजी विजेतेपदाचा सामना होईल. आतापर्यंत, भारतीय संघ विजेतेपदासाठी एक प्रबळ दावेदार मानला जात आहे, परंतु बरेच काही आजच्या सामन्यावर अवलंबून असेल.
भारत अ संघाचा पूर्ण संघ : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, हर्ष दुबे, हर्षित राणा, अर्शद खान, आयुष बडोनी, तनुष कोटियन, प्रिन्स यादव, विप्राज निगम.
श्रीलंका अ संघाचा संघ : लसिथ क्रुस्पुले, सिनेथ जयवर्धने, निशान मदुष्का (विकेटकीपर), पवन रथनायके (कर्णधार), निपुण धनंजय, जेनिथ लियानागे, वानुजा सहान, लाहिरू समरकून, रविंदू फर्नांडो, दुलाज समुदिता, विजयकांत व्यास, डुलाज सामुदिता, विजयकांथ व्यासकांथ, गरुका संकेथ, दुविन्दु रणतुंगा, शरुजन शनमुगनाथन, चमिका हीनातिगाला.